शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

लॉकडाऊनमुळे शहरातील कचऱ्यात प्रतिदीन ३५० मेट्रीक घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 4:49 PM

कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनच्या काळात वातावरणात अनेक चांगले बदल दिसून आले आहेत. तसाच काहीसा बदल शहरात निर्माण होणाऱ्याकचऱ्यातही दिसून आला आहे. शहरातील प्रतिदिन निर्माण होणाऱ्या कचऱ्यात ३५० मेट्रीक टन घट झाल्याचे दिसून आले आहे.

ठाणे : कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्याने वातावरणातही अनेक चांगले बदल झाल्याचे दिसून आले आहे. प्रदुषणही कमी झाल्याचे दिसून आले आहे. दुसरीकडे हे बदल वातावरणात होत असतांना शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्यातही घट झाल्याची माहिती पुढे आली आहे. महापालिका हद्दीत लॉकडाऊन आधी रोज ९६३ मेट्रीक टन कचरा निर्माण होत होता. परंतु एप्रिल आणि मे या दोन महिन्यांच्या कालावधीत प्रतिदिन त्यात ३५० मेट्रीक टन कचऱ्याची घट झाल्याचे दिसून आले आहे.                    ठाणे महापालिका हद्दीत दिवसेंदिवस कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा कालावधीही वाढविला जात आहे. संपूर्ण ठाणे शहरच आता रेड झोनमध्ये आले आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवांवरही त्याचा परिणाम झाला आहे. यामुळे शहरात वाहनांचा वेग मंदावल्याने त्याचा चांगला परिणाम दिसून आला आहे. वातावरणातील प्रुदषणही कमी झाल्याचे दिसून आले आहे. तलाव, खाडीतील प्रदुषणातही घट झाल्याचे दिसून आले आहे. तर ठाणे महापालिका हद्दीत याच लॉकडाऊनमुळे शहरात रोज निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर देखील परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. शहरात लॉकडाऊन लागू होण्यापूर्वी प्रतिदीन ९६३ मेट्रीक टन विविध कचऱ्याची निर्मिती होत होती. परंतु लॉकडाऊन लागू झाल्यापासून शहरातील कचऱ्यामध्येही घट झाल्याचे दिसून आले आहे. शहरात आता प्रतिदीन ३५० मेट्रीक कमी कचरा तयार होत असल्याची माहिती महापालिकेच्या सुत्रांनी दिली आहे. सोसायटी, झोपडपटटी भागातून कचरा कमी झालेला नाही. परंतु कर्मशिअल ठिकाणांवरील कचरा कमी झाल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. शहरात अनेक ठिकाणी बाजार बंद झाले आहेत, भाजी मार्केट बंद आहेत, व्यावासायिक दुकाने, हॉटेल आदी बंद झाल्याने त्यांचा कचरा तयार होत नाही. त्यामुळे कचऱ्याच्या निर्मितीवरही परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. यामध्ये सर्व प्रकारच्या कचऱ्याचा समावेश आहे. या कचऱ्याच्या कमी झालेल्या निर्मितीमुळे शहरातील बाजारपेठात कचऱ्याची दुर्गंधी बंद झाली आहे, येथील रस्ते साफ, स्वच्छ दिसत आहेत. शहरातील इतर ठिकाणचे रस्तेही स्वच्छ दिसत आहेत. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या