शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : कल्याण-डोंबिवलीत लॉकडाऊन?, आमदारांनी बैठकीत केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 00:40 IST

वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी शहरात पुन्हा किमान १० ते १५ दिवस लॉकडाऊन करावे, अशी मागणी आमदारांनी शनिवारी झालेल्या पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीत केली आहे.

कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपा हद्दीतील कोरोनाच्या रुग्णांची संख्या तीन हजारांच्या घरात गेली आहे. त्यामुळे वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी शहरात पुन्हा किमान १० ते १५ दिवस लॉकडाऊन करावे, अशी मागणी आमदारांनी शनिवारी झालेल्या पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीत केली आहे. त्यावर, शहराच्या पातळीवर लॉकडाऊन लागू करण्याबाबत आयुक्त निर्णय घेऊ शकतात, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्रे रंगमंदिरातील कॉन्फरन्स हॉलमध्ये बैठक घेतली. या वेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर, भाजप आमदार रवींद्र चव्हाण, गणपत गायकवाड, मनसेचे आमदार राजू पाटील, महापौर विनीता राणे, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी उपस्थित होते.अनलॉक-१ मध्ये शहरातील जनजीवन पूर्वपदावर येऊ लागल्याने नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र, कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता भिवंडी महापालिकेच्या महासभेत शहरात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला. केडीएमसी हद्दीतही रुग्णांची संख्या वाढली असून मृतांची संख्याही ६९ वर पोहोचली आहे. त्यामुळे वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी पुन्हा १५ दिवसांचे लॉकडाऊन करावे, अशी मागणी मनसेचे आमदार पाटील यांनी केली. आमदार चव्हाण, गायकवाड, भोईर यांनी ही मागणी उचलून धरली. त्यामुळे या मागणीचा विचार प्रशासनाने करावा, अशा सूचना पालकमंत्री शिंदे यांनी महापालिका आयुक्तांना दिल्या आहेत.सध्या कंटेनमेंट झोनचे पालन केले जात असले, तरी रुग्णांची संख्या काही कमी होत नाही. बैठकीनंतर १० ते १५ दिवसांचा लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने अथवा एकाच वेळी करण्यासाठी नियोजन केले जाईल, असे सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.दरम्यान रुग्णांना बेड, आॅक्सिजन व व्हेंटिलेटरची सुविधा मिळत नाही. उपचार न मिळाल्याने रुग्णांचे मृत्यू होत आहेत, याकडे आ. चव्हाण व गायकवाड यांनी यावेळी लक्ष वेधत प्रशासनास फैलावर घेतले.>बेड वाढवण्याचे आदेशपालकमंत्री शिंदे यांनी बैठकीनंतर सांगितले की, ‘वाढती रुग्णसंख्या पाहता आॅक्सिजन व व्हेंटिलेटर बेडची संख्या वाढविण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार, त्यांच्याकडून काम सुरू आहे. राज्य सरकारने १७ कोटींचा निधी केडीएमसीला दिला आहे. कोविड उपचारासाठी हा निधी खर्च केला जाणार आहे. आणखीन निधीची आवश्यकता भासल्यास कोविडसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही.’