शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यामुळे वाढला कल्याण, डोंबिवलीचा लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 00:54 IST

अनलॉक-१ मध्ये नागरिक अनावश्यक फिरू लागल्याने दिवसाला ६०० पेक्षा जास्त रुग्ण आढळू लागले. त्यासाठी केडीएमसीने आरोग्य विभाग व पोलिसांचे मत घेऊन लॉकडाऊन केला.

कल्याण : केडीएमसी हद्दीत लॉकडाऊनमुळे रुग्णसंख्या स्थिरावली आहे. लॉकडाऊन केले नसते तर कदाचित जास्त रुग्णसंख्या असती. मात्र, लॉकडाऊन पुन्हा वाढवायचे की नाही, याबाबत केडीएमसीने अद्याप निर्णय घेतलेला नाही. दरम्यान, सर्वसामान्यांकडून लॉकडाऊनला तीव्र विरोध होत आहे.अनलॉक-१ मध्ये नागरिक अनावश्यक फिरू लागल्याने दिवसाला ६०० पेक्षा जास्त रुग्ण आढळू लागले. त्यासाठी केडीएमसीने आरोग्य विभाग व पोलिसांचे मत घेऊन लॉकडाऊन केला. मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले की, लॉकडाऊन वाढविल्याने रुग्णसंख्या ४५० ते ५०० च्या दरम्यान स्थिरावली आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यास प्राधान्य आहे. जिल्ह्यात लॉकडाऊनची पहिली घोषणा ठाणे महापालिकेने केली होती. लॉकडाऊनची मुदतही ठामपाने वाढवली. केडीएमसीने त्याचे अनुकरण केले. त्यामुळे ठामपा आता काय निर्णय घेते, याकडे केडीएमसी लक्ष ठेवून आहे.लॉकडाऊनची मुदत १९ जुलैपर्यंत आहे. २० जुलैपासून रिक्षाचालकांना शहरात रिक्षा चालविण्यास परवानगी द्यावी.- प्रकाश पेणकर, अध्यक्ष, कोकण विभागीय रिक्षा-टॅक्सी महासंघलॉकडाऊनमुळे लक्ष्मी भाजी मार्केटमधील व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. मनपाने चार महिन्यांपासून दुकाने उघडू दिलेली नाही. आयुक्तांकडे मागणी करूनही त्यांनी दखल घेतली नाही. अन्नधान्य मार्केटला मुभा दिली जाते, मात्र भाजीविक्रेत्यांना परवानगी दिली जात नाही. त्यामुळे आमच्यावर आत्महत्येची वेळ आली आहे.- मोहन नाईक, पदाधिकारी,भाजीविक्रेता संघटना

टॅग्स :kalyanकल्याण