शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनचा असाही केला जातोय सदुउपयोग ब्रम्हांड सोसायटीचा अनोखा उपक्रम, एक हजार नागरीकांनी घेतला घरातूनच आस्वाद, जो पर्यंत लॉकडाऊन असेल तो पर्यंत रहिवाशांना विरंगुळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 18:49 IST

घोडबंदर भागातील ब्रम्हांड येथील फेज ६ मधील रहिवाशांनी आता कोरोनाशी लढा देण्यासाठी आणि प्रत्येक नागरीकाच्या मनात उर्जा निर्माण करण्यासाठी एक वेगळी शक्कल लढविली आहे. त्यानुसार येथील रहिवाशांना आता रोज एक तास मनोरंजनाची अनोखी मजेवानी चाखण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

अजित मांडके, विशाल हळदेठाणे : एकीकडे लॉकडाऊनमुळे नागरीक घरात बसून आधीच वैतागले आहेत, त्यात सकाळी टीव्ही लावली की कोरोना, सांयकाळी लावली तरी कोरोना, मोबाइल उघडला तरी कोरोना त्यामुळे नागरीकांचे मानसिक खच्चीकरण होऊ लागले आहे, त्यामुळे त्याचा आरोग्यावरही विपरीत परिणाम होऊ लागला आहे. परंतु आता याच लॉकडाऊनचा चांगला सदुउपयोग करण्यासाठी घोडबंदर भागातील ब्रम्हाड मधील काही सोसायटीधारकांनी पुढाकार घेतला आहे. येथील ब्रन्हाड फेज ६ मधील रहिवाशांनी येथील तब्बल १ हजार कुटुंबांचे लॉकडाऊन असे पर्यंत मनोरंजन करण्याबरोबर त्यांचे आरोग्य चांगले राहावे या उद्देशाने बुधवार पासून अनोखा उपक्रम सुरु केला आहे. त्यानुसार बुधवारी पहिल्या दिवशी सोसायटीतील एका सदस्याने सोसायटीच्या आवारातच गिटार हातून घेऊन गाण्यांचा नजराना पेश केला. त्यामुळे येथील रहिवाशांच्या मनातील भीती तर कमी झालीच शिवाय कोरोना विरुध्द लढा देण्यासाठी एक प्रकारे उर्जा देखील मिळाली आहे.                       सध्या संपूर्ण जगात कोरोनाच्या आजाराने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. ठाण्यातही कोरोनाचा आकडा वाढत आहे, त्यामुळे लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे. या लॉकडाऊनमुळे नागरीकांना दिवसभर घरीच राहावे लागत आहे, त्यामुळे चिडचीड देखील त्यांच्यात सुरु झाली आहे. त्यात सकाळ पासून रात्रभर टिव्ही लावला तरी कोरोनाची भिती सतत मनात घर करुन जात आहे. त्यामुळे मानसिक खच्चीकरण आणि त्यातूनच इतर आजारांनाही यातून आमंत्रण दिले जात आहे. त्यामुळे यातून बाहेर पडण्यासाठी ब्रम्हांड भागातील फेज ६ मधील रहिवाशांनी एक अनोखी शक्कल लढविली आहे. येथील रहिवाशांचे मनोरंजन करण्यासाठी सोसायटीमधील काही नागरीकच पुढे आले आहेत. त्यानुसार ब्रम्हांड फेज ६ मधील ८ इमारती असून त्यामध्ये २१८ फ्लॅट आहेत, तर यामध्ये तब्बल १ हजाराहून अधिक नागरीक वास्तव्य करीत आहेत. त्या सर्वांचे मनोरंजन आता अनोख्या पध्दतीने केले जात आहे.                 त्याचा शुभारंभ बुधवारी सुमधुर गाण्यांनी झाला, यावेळी सोसायटीमधीलच कृष्णतेजा या तरुणाने सांयकाळी पाच ते सहा या वेळेत हे अनेक सुमधुर गाणी सादर केली. यामध्ये शेवटेच गाणे हम होंगे कामयाब सादर केले आणि या गाण्यावर सोसायटीमधील सर्वांनीच सुर धरला आणि कोरोनाशी लढण्यासाठी आम्ही कसे सज्ज आहोत, हे दाखवून दिले. विशेष म्हणजे केवळ गाण्यांचाच नाही तर जुंबा डान्स ते ही एक ते दोघांचा, योगा आदींसह इतरही आरोग्य विषयक उपक्रम, गाणी आदींच्या माध्यमातून लॉकडाऊनच्या काळात येथील रहिवाशांचा विरंगुळा केला जाणार असून त्यांच्यात एक सकारात्मक उर्जा निर्माण करण्याचाही आमचा प्रयत्न असल्याची माहिती येथील रहिवासी शिवकुमार शेटटी यांनी दिली. लॉकडाऊन वाढल्यानंतरही अशाच प्रकारे रोज एक तास नागरीकांना आपल्या घरातच राहून ही मनोरंजनाची साधने उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. तसेच ब्रम्हांड भागातील १८ जेष्ठ नागरीकांच्या घरी जाऊन त्यांना जेवणाची व इतर व्यवस्था करण्याचेही काम यांच्या माध्यमातून सुरु आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या