शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
3
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
4
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
7
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
8
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
9
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
10
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
11
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
12
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
13
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
14
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
15
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
16
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
17
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
18
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
19
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
20
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली

टोरंटविरोधात स्थानिकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 14:09 IST

महावितरणला सक्षम करा आणि टोरंट कंपनीला हद्दपार करा; गावकऱ्यांची मागणी

ठाणे: कळवा, मुंब्रा, शिळ, दिवा विभागातील वीज वितरण आणि वीज बिल वसुलीचे खाजगीकरण करण्यात आले असून तसे कंत्राट टोरंट या कंपनीला देण्यात आले आहे. महावितरणला सक्षम करा आणि टोरंट कंपनीला हद्दपार करा या मागणीसाठी अनेक दिवसांपासून या भागात आंदोलन सुरु  असून आता या आंदोलनाची धार अधिक तीव्र करीत गावकऱ्यांनी आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून शासनाचा निषेध केला. 

टोरंट हटाव वीज ग्राहक बचाव अशी मागणी करत जिल्हाधिकारी कार्यालयावर जनमोर्चा टोरेन्ट हटाव कृती समितीने आज काढला. टोरंट हटाव कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी शिवसेनेचे नगरसेवक उमेश पाटील, माजी नगरसेवक हिरा पाटील आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. टोरंट संदर्भात यापूर्वी वारंवार बैठकीचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार तीन वेळा बैठका लावण्यात आल्या होत्या. मात्र त्या तीनही बैठका रद्द करण्यात आल्याचेही पाटील सांगितले. मध्यतंरी खासदार श्रीकांत शिंदे यांनी यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्यापही त्यावर निर्णय न झाल्याची माहिती पाटील यांनी दिली.