शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

लोकल प्रवासबंदी पडली वाहनविक्रेत्यांच्या पथ्थ्यावर, सवलतींमुळे वाढली विक्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2020 07:16 IST

Thane News : कोरोनामुळे मार्च महिन्यापासून लॉकडाऊन लागले होते. सलग तीन महिने कडक लॉकडाऊन राहिल्याने याचा फटका बहुतांश  व्यवसायांना बसला.  मात्र, जूनच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झालेल्या अनलॉकमुळे व्यावसायिकांना काहिसा दिलासा मिळाला.

डोंबिवली :  कोरोनाच्या प्रादुर्भावात अनेक व्यवसायांना फटका बसला असताना वाहनविक्रेत्यांना अनलॉकमध्ये अच्छे दिन आल्याचे पाहायला मिळत आहे. रेल्वे  प्रवासबंदीमुळे अनलॉकमध्ये वाहनांच्या खरेदीला अधिक पंसती  मिळाली. अद्यापही काही जणांना ही  बंधने  कायम असल्याने दस-याच्या मुहुर्तावर वाहनखरेदीला पसंती दिली.कोरोनामुळे मार्च महिन्यापासून लॉकडाऊन लागले होते. सलग तीन महिने कडक लॉकडाऊन राहिल्याने याचा फटका बहुतांश  व्यवसायांना बसला.  मात्र, जूनच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झालेल्या अनलॉकमुळे व्यावसायिकांना काहिसा दिलासा मिळाला. वाहनविक्रेत्यांचा आढावा  घेता गुढीपाडवा आणि अक्षय तृतीया या  सणांमध्ये लॉकडाऊन लागू असल्याने वाहनविक्री करता आली नाही. यात विक्रेत्यांना मोठे  नुकसान सहन करावेलागले. परंतु, अनलॉकपासून वेळेचे बंधन घालून  व्यावसायिकांना दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली.वाहनविक्रेत्यानीही आपले व्यवसाय सुरू केले. सर्वसामान्यांसाठी रेल्वे प्रवास  बंद असल्याने चाकरमान्यांना स्वत:चे वाहन असणे गरजेच वाटले. चत्यामुळे अनलॉकमध्ये मोठ्या प्रमाणावर ग्राहकांकडून वाहनांची खरेदी झाल्याचे व्यावसायिक सांगतात. गुढीपाडवा आणि अक्षयतृतीया या सणांना झालेला तोटा अनलॉकमध्ये  भरून काढल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आले. कोरोनामुळे यंदाच्या दस-याला वाहनखरेदी फारशी होणार  नाही, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. परंतु, अद्याप रेल्वेसेवा सर्वांसाठी खुली न  झाल्याने ही अपेक्षा फोल ठरली आहे. दस-याच्या मुहुर्तावर वाहनखरेदीसाठीवाहनांच्या शोरूममध्ये गर्दी झाली होती.

टॅग्स :businessव्यवसायthaneठाणे