शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

घणसोली स्थानकात लोकलचे डबे अनकपल, ट्रान्सहार्बरचा खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 18:52 IST

ट्रान्सहार्बरमार्गे ठाण्याहून पनवेलला जाणा-या लोकल अनकपल झाल्याने डबे एकमेकांपासून वेगळे झाल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी ४ वाजून १६ मिनिटांनी घणसोली स्थानकात घडली.

ठळक मुद्दे ठाणे-पनवेल लोकलला झाला अपघातसव्वातास ट्रान्सहार्बर विस्कळीत

डोंबिवली: ट्रान्सहार्बरमार्गे ठाण्याहून पनवेलला जाणा-या लोकल अनकपल झाल्याने डबे एकमेकांपासून वेगळे झाल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी ४ वाजून १६ मिनिटांनी घणसोली स्थानकात घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण या घटनेमुळे सव्वातास ट्रान्सहार्बरच्या डाऊन मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.ठाणे स्थानकातून संध्याकाळी ४ वाजण्याच्या सुमारास पनवेलच्या दिशेने निघालेली लोकल घणसोली स्थानकात ४.१४ च्या सुमारास पोहोचली. तेथून निघतांना हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले. लोकलचे डबे एकमेकांपासून वेगळे झाल्याचे बघणयासाठी प्रवाशांनी एकच गर्दी केली होती. स्थानकातच ही घटना घडल्याने लोकल तातडीने रिकामी करण्यात आली. रेल्वे प्रशासनाच्या तांत्रिक दुरुस्ति विभागाच्या कर्मचा-यांनी घटनास्थळी धाव घेत डबे जोडण्यासाठी प्रयत्न केले. अखेरीस सव्वातासाने संध्याकाळी ५ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास ही लोकल पनवेलच्या दिशेने पुढे धावल्याची माहिती कोपरखैरणे, ठाणे लोहमार्ग पोलिसांनी दिली. हा अपघात नेमका कशामुळे झाला याबाबतची माहिती घेण्यासाठी मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनिल उदासी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी लोकल अनकपल झाल्याने हा अपघात घडल्याचे सांगितले . त्यानंतर ठाणे स्थानकातून वाशीकडे जाणा-या लोकल हळुहळु पुढे धावल्या. पण तोपर्यंत ट्रान्सहार्बरचे वेळापत्रक सपशेल कोलमडले होते. त्याचा फटका संध्याकाळी घरी परतणा-या लाखो चाकरमान्यांना बसला.

टॅग्स :thaneठाणेdombivaliडोंबिवली