शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या दुर्लक्षाने नागरिकांचे जीव धोक्यात, उल्हासनगरातील रस्त्यावर खडीचा मारा, अपघातात वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 15:51 IST

Ulhasnagar: पावसाळ्यापूर्वी रस्त्यातील खड्डे भरले नसल्याने रस्त्याची दुरावस्था झाली असून खड्यावर दगड खडी टाकण्यात येत आहे. दगड खडीवरून दुचाकीस्वार घसरून पडत असल्याने, त्यांच्या जीवितास पालिका जबाबदार असल्याची टीका होत आहे.

- सदानंद नाईक 

उल्हासनगर : पावसाळ्यापूर्वी रस्त्यातील खड्डे भरले नसल्याने रस्त्याची दुरावस्था झाली असून खड्यावर दगड खडी टाकण्यात येत आहे. दगड खडीवरून दुचाकीस्वार घसरून पडत असल्याने, त्यांच्या जीवितास पालिका जबाबदार असल्याची टीका होत आहे.

 उल्हासनगरातील डांबरीकरण रस्त्यासह सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याची दुरावस्था झाली असून महापालिका बांधकाम विभाग खड्ड्यात दगडखडी टाकत आहे. मात्र टाकलेल्या दगडखडीमुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली. दगड खडीवरून दुचाकीसह मोठ्या वाहने घसरून अपघात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अपघातात जिवीतहानी झाल्यास त्याला महापालिका जबाबदार राहणार असल्याचे मत समाजसेवक प्रशांत चंदनशिवे व प्रवीण कारीरा यांनी व्यक्त करून तसे लेखी निवेदन महापालिकेला दिले. कुर्ला कॅम्प काली माता चौका समोरील संपूर्ण रस्त्यावर दगड खडी टाकण्यात आली. दगड खडीवरून अनेक दुचाकीस्वार पडून जखमी झाल्याचे चंदनशिवे यांचे म्हणणे आहे. 

महापालिका बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व शहर अभियंता महेश शितलानी यांनी पाऊस सुरू असल्याने, रस्त्यातील खड्डे व दुरावस्था झालेल्या रस्त्याचे डांबरीकरण करता येत नाही. तसेच तात्पुरत्या काळासाठी खड्डे पडलेल्या रस्त्यात खडी टाकण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. पावसाने उसंत दिलीतर, रस्त्याची दुरुस्ती त्वरित सुरू करण्यात येणार असून त्यासाठी साडे सहा कोटीच्या निधीची तरतूद केल्याचेही ते म्हणाले. व्हीनस चौक ते मोर्यानगरी रस्ता, कुर्ला कॅम्प रस्ता, खेमानी रस्ता, मोर्यांनगरी माणेरेगाव रस्ता, पवई चौक ते विठ्ठलवाडी स्टेशन रस्ता, जुना बस स्टॉप रस्ता, कल्याण ते बदलापूर रस्ता यांच्यासह शहर अंतर्गत रस्त्याची दुरावस्था झाली. रिक्षा संघटना, वाहन चालक, राजकीय नेते, नागरिकांनी रस्त्याच्या दुरावस्थे साठी महापालिकेला जबाबदार धरले आहे. 

रस्त्याची दुरुस्ती युद्धपातळीवर...उपायुक्त नाईकवाडे शहरातील बहुतांश डांबरीकरणाचे रस्ते खड्डेमय झाले असून रस्त्यातील खड्डे पावसाळ्यापूर्वी भरणे अपेक्षित होते. मात्र काही तांत्रिक कारणाने ते भरण्यात आले नाही. पाऊसाचे प्रमाण कमी झाल्यास त्वरित रस्त्याचे डांबरीकरण व खड्डे भरण्याचे काम महापालिका बांधकाम विभाग युद्धपातळीवर सुरू करण्याची प्रतिक्रिया उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली. तसेच सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यातील खड्डे भरण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर