शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

लिव्हरपूल स्टार्टअप परिषद : आयुक्त-महापौर वाद शिगेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 04:18 IST

मागील काही महिन्यांपासून शिवसेना आणि प्रशासन यांच्यातील मैत्रीच्या सलोख्यात पुन्हा आयुक्त-महापौरांच्या वादाने ठिणगी पडली आहे.

ठाणे  - मागील काही महिन्यांपासून शिवसेना आणि प्रशासन यांच्यातील मैत्रीच्या सलोख्यात पुन्हा आयुक्त-महापौरांच्या वादाने ठिणगी पडली आहे. लिव्हरपूल, लंडन येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय बिझनेस फेस्टिव्हलमध्ये देशातील सर्वात मोठा स्टार्टअप प्रकल्प सादर करण्यास महापौर मीनाक्षी शिंदे यांनी ऐनवेळी मंजुरी न दिल्याने संधी हुकली असल्याचा आरोप थेट आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पत्रक काढून केला आहे. यापूर्वी होणारे वाद हे चार भिंतीआड होत होते. परंतु, आता असे काय घडले की, आयुक्तांना थेट हे पत्रकच काढावे लागले, याचे कुतूहल मात्र वाढले आहे.ठाणे महापालिकेने केंद्र सरकारच्या स्टार्टअप प्रोग्राममध्ये सहभागी होऊन रुस्तमजी येथे स्टार्टअप संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, येथे सुमारे लाखभर रोजगार निर्माण होणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. ब्रिटिश सरकारने येत्या १८ ते २२ तारखांच्या कालावधीत लिव्हरपूल, लंडन येथे आंतरराष्ट्रीय बिझनेस फेस्टिव्हलचे आयोजन केले आहे. त्यामध्ये महापालिका देशातील सर्वात मोठ्या स्टार्टअप प्रकल्पाचे प्रदर्शन मांडणार होती.महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना या प्रकल्पाविषयी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांसमोर सादरीकरण करण्याची संधी मिळणार होती. यासाठी एकूण ८.५० लाखांचा खर्च अपेक्षित होता. आयत्या वेळेचा विषय म्हणून तो महासभेसमोर पाठवला होता. त्यास मान्यता मिळाली नाही.यासंदर्भात महापालिका सचिव अशोक बुरपल्ले व उपायुक्त संदीप माळवी यांनी महापौर मीनाक्षी राजेंद्र शिंदे यांना विनंती केली होती. परंतु, त्यांनी त्यास नकार दिल्याने आता या फेस्टिव्हलमधून बाहेर पडावे लागल्याचे प्रशासनाने प्रसिद्धिपत्रकात नमूद करून महापौरांनाच जबाबदार ठरवले आहे.याबाबत, महापौर मीनाक्षी शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, दोन दिवसांपूर्वी मला दोन अधिकारी भेटण्यास आले होते. मागील महिन्यात झालेल्या महासभेतील विषयात आयत्या वेळेचा विषय म्हणून या विषयाला तुम्ही मान्यता द्या, असे त्यांचे म्हणणे होते. परंतु, २२ दिवस उलटल्यानंतर मी अशा प्रकारे या विषयाला कशी काय मंजुरी देणार, तसेच त्याला नुसती माझी मंजुरीच गरजेची नसून महासभेचीही मंजुरी हवी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मागील वर्षभरात आयत्यावेळच्या कोणत्याच विषयांना मंजुरी दिलेली नाही. त्यातही आयुक्तांना स्वत:ला २५ लाखांच्या खर्चाबाबत अधिकार आहेत, त्या अधिकारात ते मंजूर करून घेऊ शकले असते. यापूर्वीही मागील वर्षभरात आयुक्तांनी विदेश दौरे केले आहेत, त्यावेळी त्यांना कधी महासभेच्या मंजुरीची गरज भासली नव्हती का, असा सवाल महापौरांनी उपस्थित केला आहे.वादाचे कारण की...रस्टार्ट अप प्रकल्पाविषयी आंतरराष्टÑीय तज्ज्ञांसमोर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल सादरीकरण करणार होते.या सादरीकरणासाठी ८.५० लाखांचा खर्च अपेक्षित होता. त्या खर्चाला महासभेने मान्यता नाकारली.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाnewsबातम्या