शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

लहान भावाने केली मोठ्या भावाची हत्या, शिर, हात कापून केले वेगळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2018 05:42 IST

एटीएममधून परस्पर २० हजार रुपये काढल्याने मोठा भाऊ सतत रागावत होता.

मीरा रोड (ठाणे) : एटीएममधून परस्पर २० हजार रुपये काढल्याने मोठा भाऊ सतत रागावत होता. तो पैसे परत करण्याची मागणी करत होता, त्यातून लहान भावाने थेट मोठ्या भावाची हत्या करून शिर व हात कापून वेगळे केल्याची खळबळ घटना भार्इंदरमध्ये घडली. घटनेनंतर लहान भाऊ स्वत:च पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याने हत्येची कबुली दिली.जय पांडुरंग कृपा इमारतीत विल्फ्रेड पेट्राओ (३६) व त्याचा भाऊ सायमन (२१) राहतात. दोघेही अविवाहित असून त्यांचा एक भाऊ व्हिक्टर हा दुबईला, तर आणखी एख भाऊ नोबेल हा मालाडला राहतो. सदनिका व्हिक्टरच्या नावावर आहे. सायमन हा कॉल सेंटरमध्ये काम करायचा. सध्या तो बेरोजगार आहे. विल्फ्रेड हा बोरिवलीला सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. सायमनने विल्फ्रेडला न विचारताच त्याचे एटीएम कार्ड घेऊन २० हजार रुपये काढले होते.त्यामुळे विल्फ्रेड संतापला होता. त्यावरून दोघांमध्ये भांडणे व्हायची. विल्फ्रेड हा सायमनकडे आपले पैसे परत कर, तगादा लावत होता. विल्फ्रेड कामावरून आल्यानंतर झोपलेल्या सायमनने बराच वेळ दार उघडले नाही. त्यामुळे दोघांमध्ये भांडण झाले. शनिवारी पहाटे ४ च्या दरम्यान सायमनने चाकूने विल्फ्रेडच्या छातीत वार केले. त्याचा जागीच मृत्यू झाला. सायमनने त्याचे शिर व दोन्ही हात लहान करवतीने कापले. ते प्लास्टिकमध्ये बांधून बाथरूममध्ये तर धड व पाय हे बेडरूममध्ये बांधून ठेवले. दुपारी सायमन स्वत:च नवघर पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलिसांना त्याने भावाची हत्या केल्याचे सांगितले. सायमनला अटक केल्याचे वरिष्ठ निरीक्षक राम भालसिंग यांनी सांगितले.

टॅग्स :Murderखूनmira roadमीरा रोड