शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

साहित्यिक बोलला की गोळ्या घालतात! राजन खान यांची स्पष्टोक्ती, सद्य:स्थितीवर केले मार्मिक भाष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 06:41 IST

देशात घडणाºया घटनांवर केवळ साहित्यिकांनीच भाष्य करावे असे नाही, तर शेतकºयांनी आणि समाजातील अन्य घटकांनीही बोलले पाहिजे. पण एखादा लेखक-साहित्यिक बोलला तर त्यांना गोळ््या घातल्या जातात, अशी परिस्थिती सध्या आहे, असे परखड मत साहित्यिक राजन खान यांनी रविवारी ‘लोकमत’कडे मांडले.

जान्हवी मोर्ये  कल्याण : देशात घडणाºया घटनांवर केवळ साहित्यिकांनीच भाष्य करावे असे नाही, तर शेतकºयांनी आणि समाजातील अन्य घटकांनीही बोलले पाहिजे. पण एखादा लेखक-साहित्यिक बोलला तर त्यांना गोळ््या घातल्या जातात, अशी परिस्थिती सध्या आहे, असे परखड मत साहित्यिक राजन खान यांनी रविवारी ‘लोकमत’कडे मांडले.जात पाळणे हा लोकशाहीने दिलेला अधिकार असल्याचे समजणे हा आपला ढोंगीपणा आहे. ज्या देशात जात, धर्म आणि देव यांचे अवास्तव अवडंबर माजवले जाते, तो समाज आणइ या विषयावरील वाद मनोरुग्णतेचे लक्षण असते, अशी टीकाही त्यांनी मेधा खोले यांच्या सोवळ््याच्या प्रकरणावरून उठलेल्या वादावर केली. खोलेंविरोधात तक्रार करणारे स्वत: किती विज्ञाननिष्ठ आहेत, असा सवाल त्यांनी केला. खोले आणि त्यांच्यावरील टीकाकारांनी विज्ञाननिष्ठ होण्याची गरज असल्याचे मत त्यांनी मांडले. पृथ्वीसारख्या चार ग्रहांचा शोध लागला. त्यावर गेल्या दोन वर्षात किती चर्चा झाली, असा सवाल करून नेपच्यून ग्रहावर पंतप्रधानांनी अद्याप टिष्ट्वट का केले नाही, असा तिरकस सवाल केला. आपण भारतीय संस्कृतीबद्दल अभिमान व्यक्त करतो. पण संस्कृती म्हणून आपल्याकडे काय शिल्लक आहे? सगळ््या पृथ्वीवरील संस्कृतीची सरमिसळ होत नवी संस्कृती तयार होत असते. तसे ४० लाख वर्षांपासून होत आहे. सर्वच संस्कृतींवर तिचा प्रभाव पडतो. त्यामुळे आपली संस्कृती, आपले साहित्य, आमचे मराठी साहित्य असा वृथा अभिमान बाळगून त्याबद्दल गर्वाने काही सांगत असू तर त्यातून आपला मूर्खपणाच प्रतीत होतो. साºया गोष्टी जगभरातून राबवून आपल्याकडे आल्या असल्याने हा एक प्रकारचा संकर आहे. त्यातील कशावरही हक्क सांगत आमचे म्हणून त्याचा गर्व बाळगण्याचे कारण नाही, असा टोला त्यांनी संस्कतीचे गोडवे गाणाºयांना लगावला.साहित्यातील सारेच पॅटर्न कुठून ना कुठून चोरलेले!खोले यांच्या सोवळ््याच्या प्रकरणावर लिहावे, असा साहित्याचा फॉर्मच अद्याप आपल्याकडे नाही. साहित्यचे सगळे पॅटर्न आपण चोरलेले आहे. कविता बाहेरुन आलेली आहे. अभंग आणि ओव्या या सुफी व अरबांकडून आलेल्या आहेत, असा दाखला त्यांनी दिला.ाहाराष्ट्रातील पहिली लावणी ही ४०० वर्षापूर्वी दखणी भाषेत मुस्लिम कवीने लिहिली. पण साहित्याचा इतिहासही सोयीस्कर पद्धतीने लिहिणारे ‘आपले कोण’ हे जाणून घेऊन त्यांचीच नावे इतिहासात ठासतात. तिथे दुसºया धर्मीयाने लिहिलेल्या साहित्याची दखल कशी घेणार, असा सवाल करत खान यांनी साहित्याच्या प्रांतातील जातीवादावर बोट ठेवले.ज्ञानेश्वरांना आपण आद्य कवी मानतो. त्यांनी कोणाकडे शिक्षण घेतले? त्यांच्या आधीही आणि त्यांच्या समकालात कोणी तरी कवी असतीलच ना? पण त्यांचा विचार आपण करीत नाही. त्यामुळे आद्य असे काही नसते. गौतम बुद्ध हे पहिले बुद्ध नव्हते. त्याआधीही आणखी कोणी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. चिनी-अरबांनी आपल्याला लेखन शिकवले. जे काही आहे ‘ते इधर उधरसे उठाया हुआ है’ अशा शब्दांत त्यांनी साहित्यिकांना बोचरे चिमटे काढले.