शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवाप्रमाणेच सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाचे मंडप भाडेही माफ होणार

By अजित मांडके | Updated: September 20, 2022 16:00 IST

  ठाणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील ठाणे महापालिका हद्दीतील सर्व सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाना संपूर्णत: भाडेमाफ द्यावी अशी ...

 ठाणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील ठाणे महापालिका हद्दीतील सर्व सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाना संपूर्णत: भाडेमाफ द्यावी अशी लेखी मागणी ठाण्याचे माजी महापौर व शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांचेकडे केली आहे. याची तातडीने दखल घेवून आयुक्तांनी तातडीने सकारात्मक निर्णय घेवून सर्व नवरात्रौत्सव मंडळाचे भाडेमाफ केल्याबद्दल त्यांचे आभार देखील व्यक्त केले आहेत.मागील दोन वर्षे कोरोनाचा काळ असल्यामुळे बहुतांशी सार्वजनिक मंडळे आर्थिक विवंचनेत आहेत. सर्व सार्वजनिक मंडळे सामाजिक उपक्रम राबवित असतात, या मंडळांचा  शहराच्या जडणघडणीत मोलाचा सहभाग नेहमीच असतो. सामाजिक बांधिलकी जपत ही मंडळे गेली अनेकवर्षे काम करीत आहेत, या मंडळांना दिलासा मिळावा या दृष्टीकोनातून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे संपूर्ण भाडे  माफ केले होते, यामुळे सार्वजनिक मंडळांना निश्चितच दिलासा मिळाला आहे, याच धर्तीवर सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळांना देखील संपूर्ण भाडे माफी द्यावी अशी मागणी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्याकडे केल्यावर त्यांनी सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळांचे भाडे माफ करावे असे आदेश सर्व संबंधितांना दिले आहेत.            या निर्णयामुळे सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळांना देखील दिलासा मिळणार आहे. सर्व मंडळांनी महापालिकेने आखून दिलेल्या नियमांचे पालन करुन नवरात्रौत्सव साजरा करावा असे आवाहन म्हस्के यांनी केले आहे.  

 

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणे