शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

तीन भावांना जन्मठेप; सात जण निर्दाेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 03:23 IST

मुरबाड तालुक्यातील टोकावडे, खापरी येथील जमिनीच्या वादातून १० वर्षांपूर्वी तानाजी राऊत यांची हत्या झाली होती. या खटल्याचा निकाल शनिवारी कल्याण सत्र न्यायालयाने दिला.

कल्याण/टोकावडे : मुरबाड तालुक्यातील टोकावडे, खापरी येथील जमिनीच्या वादातून १० वर्षांपूर्वी तानाजी राऊत यांची हत्या झाली होती. या खटल्याचा निकाल शनिवारी कल्याण सत्र न्यायालयाने दिला. एकूण १० आरोपींपैकी तिघांना जन्मठेपेची शिक्षा तर उर्वरित सात आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दाेष मुक्तता झाली.खापरी येथील प्रभाकर शंकर राऊत यांनी गावातील काही शेतकऱ्यांची जमीन त्यांच्या नकळत परस्पर गुजरात येथील व्यक्तीला विकण्याचा घाट घातला होता. या जमिनीपोटी राऊत यांनी बयाणा घेतला. ही बाब गावातील निवृत्त आरोग्य कर्मचारी तानाजी हिरू राऊत यांच्या निदर्शनास येताच त्यांनी सर्व शेतक-यांनी त्याची माहिती दिली. तर आम्ही कोणीही प्रभाकर राऊत यांच्यामार्फत जमीन विकलेली नाही, असे संबंधितांनी तानाजी यांना सांगितले.दरम्यान, सर्व शेतकºयांनी टोकावडे पोलीस ठाण्यात प्रभाकर राऊत यांच्याविरोधात तक्रार दिली. त्या रागातून ग्रा.पं. निवडणुकीच्या दिवशी प्रभाकर राऊत याने त्याचे भाऊ आणि पुतण्यासह तानाजी राऊत यांच्या घरात शिरकाव केला आणि तानाजी यांना रस्त्यावर आणून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केली. त्यात गंभीर जखमी झालेल्या तानाजी यांना टोकावडे येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना मुंबईतील जे. जे. रु ग्णालयात हलवण्यात आले. परंतु, तेथे दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी टोकावडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.>१० हजारांचा दंडया खटल्याची सुनावणी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी. एस. हाथरोटे यांच्या न्यायालयात झाली.या वेळी आरोपी प्रभाकर शंकर राऊत, सुरेश शंकर राऊत व नारायण शंकर राऊत यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच प्रत्येकी १० हजार रु पये दंड ठोठावण्यात आला.दंड न भरल्यास आणखी दोन वर्ष सश्रम कारावास भोगावा लागणार आहे. मात्र, यातील अन्य आरोपींची निर्दाेष मुक्तता करण्यात आली. या खटल्यात सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. रचना भोईर यांनी काम पाहिले.