शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे जनजीवन विस्कळीत; कल्याण कसारा रेल्वे सेवा 6 तास ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2024 14:58 IST

रात्रभर पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे आज पहाटे आटगाव रेल्वे स्थानकाच्या पुढे रेल्वे ट्रकवर झाड पडल्याने कसाऱ्याकडे जाणारी वाहतूक 2 तासाहून अधिक काळ ठप्प होती. 

शाम धुमाळ

रात्रभर पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे आज पहाटे आटगाव रेल्वे स्थानकाच्या पुढे रेल्वे ट्रकवर झाड पडल्याने कसाऱ्याकडे जाणारी वाहतूक 2 तासाहून अधिक काळ ठप्प होती. सकाळी 8 वाजता रेल्वे ट्रॅकवरील झाड व मातीचा मलबा काढण्यात आल्यानंतर कसाऱ्याकडे वाहतूक लोकल सेवा व मागे अडकलेल्या मेल एक्सप्रेस गाड्या कसाऱ्याकडे सोडण्यात आल्या. मात्र 3 तासांने सुरू झालेली रेल्वे सेवा लगेचच 15 मिनिटांनी पुन्हा बंद झाली.

वासिंद रेल्वे स्थानकाजवळ ओव्हार हेड वायरचा पोल खचल्याने रेल्वेचा ओव्हरहेड वीज पुरवठा बंद झाला व परिणामी वांसिदहून कसाराकडे जाणारी व कसाराहून मुंबई कडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली. अनिश्चित काळासाठी रेल्वे सेवा बंद झाल्याची अनाउसमेंट रेल्वेकडून करण्यात येत होती. दरम्यान यामुळे टिटवाळा ते कसारा रेल्वे स्थानकादरम्यान दोन्ही मार्गिकेवर मेल एक्सप्रेस, लोकल गाड्या अडकून पडल्या होत्या.

वासिंद जवळ रेल्वेच्या ओव्हर हेड वायरचे पोल खचल्याची माहिती मिळताच कल्याण कसाऱ्यापासून सर्व रेल्वे कर्मचारी घटनास्थळी पोहचले. रेल्वे प्रशासनाने या मार्गांवरील वीज पुरवठा बंद करून खचलेल्या पोलची दुरुस्ती सुरु केली. लटकलेल्या तारा व वाकलेले पोल ठीक करण्यास रेल्वे कर्मचाऱ्यांना तब्बल 4 तासाहून अधिक वेळ लागला. दुपारी दीड वाजेच्या दरम्यान कसारा कल्याण रेल्वे सेवा धिम्या गतीने सुरु करण्यात आली. आसनगाव,आटगाव्, खर्डी,कसारा दरम्यान अडकलेल्या मेल एक्सप्रेस गाड्या ,वंदे भारत एक्सप्रेस मुंबई रवाना करण्यात आल्या. दरम्यान रात्रभर पडत असलेल्या पावसामुळे कल्याण कसारा  रेल्वे मार्ग तब्बल 6 तासानंतर सुरळीत धिम्या गतीने सुरु झाला.

हजारो प्रवाशाचे हालदरम्यान या 6 तासाच्या नैसर्गिक मेघा ब्लॉकमुळे रेल्वे प्रवाशाचे मोठ्या प्रमाणात हाल झाले.रेल्वे प्रवाशासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने कोणतीही मदत, उपयायोजना न केल्याने  अडकलेल्या मेल एक्सप्रेस प्रवाशा चे मोटग्या प्रमाणात हाल झाले गाडीतील पेंट्री कार मधील पाणी,नाश्ता सर्व सम्पल्याने लोकांना पाणी पाणी करीत 6 तास लटकावे लागले.