शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

जिंदगी सबसे बडी टीचर है- नसीरुद्दीन शाह

By admin | Updated: December 6, 2015 00:31 IST

मला क्रिकेटर बनण्याची इच्छा होती. पण त्या खेळात अवघे ११ जण असतात आणि कलाकार मात्र भरपूर असतात. तिथे भरपूर स्कोप असतो. त्यामुळेच मी अ‍ॅक्टींगकडे वळलो. मला

ठाणे : मला क्रिकेटर बनण्याची इच्छा होती. पण त्या खेळात अवघे ११ जण असतात आणि कलाकार मात्र भरपूर असतात. तिथे भरपूर स्कोप असतो. त्यामुळेच मी अ‍ॅक्टींगकडे वळलो. मला चांगले प्रशिक्षण हवे होते. पण तसे ना मला क्रिकेटमध्ये मिळाले ना अभिनयात. जगण्याने मला अभिनय शिकवला. समृद्ध केला. जिंदगी सबसे बडी टिचर है, असे सांगत प्रसिध्द चित्रपट अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. इंद्रधुनच्या रंगोत्सवातील गप्पांमध्ये त्यांच्यातील समृद्ध कलावंत उलगडत गेला आणि श्रोते मंत्रमुग्ध झाले. १६ व्या वर्षी मी अ‍ॅक्टींगसाठी घराबाहेर पडलो. तेव्हा जो जगाचा अनुभव मला मिळाला, तोच मला उत्तम भूमिका साकार करण्यासाठी कामी आल्याचेही त्यांनी सांगितले. शाळेत मला गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राची भीती वाटायची. त्याच काळात साहित्याची मात्र गोडी लागली होती. ते आवडायचे. गोष्टी, नाटक आणि कविताही मनापासून आवडायच्या. एक माणूस दुसऱ्याशी कसा वागतो, ते जाणून घ्यायला आवडायच. कदाचित त्यातूनच अभिनयाची आवड फुलली असावी. त्यामुळे अभिनयासाठी जेव्हा घर सोडले, तेव्हाच्या काळात परिस्थितीचे चटके बसले खरे, पण माणसे खूप वाचता आली. त्या माणसांनी मला जगणे शिकवले आणि या जगण्यान अभिनय शिकविला.मराठी कलावंतांच्या समृद्ध परंपरेचा उल्लेख करताना निळू फुले, डॉ. श्रीराम लागू, भक्ती बर्वे हे चारही कलाकार दिग्गज असल्याचे ते म्हणाले. हे कलावंत जगातील दहा श्रेष्ठ कलांवतांपैकी असल्याचे गौरवोद््गारही शाह यांनी काढले. अभिनय ही शिकवण्याची गोष्ट नाही. ती एखाद्या कोर्समधून शिकता येत नाही. जेवढे शिकवले आहे, त्या पलिकडेही अ‍ॅक्टिंग असते. एखादा जादूगार येईल आणि आपल्याला अ‍ॅक्टींग शिकवेल, असे वाटत असेल तर ते विसरुन जा. आपल्यावर-स्वत:वर विश्वास ठेवा. मोकळपणाने जगाकडे पाहा आणि रस्त्यात शिकवणारा कोणी मिळाला तर त्याच्याकडूनही शिका, असा सल्ला त्यांनी दिला. रंगभूमीवरील अभिनयाच्या जीवंतपणाबद्दल ते भरभरून बोलले. मला आयुष्यभर रंगभूमीवर रहायला आवडेल, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. ‘घडवलेले’ कलावंतअभिनयाच्या कार्यशाळा पूर्ण करणाऱ्यांना शाह यांनी बरेच चिमटे काढले. असे घडवलेले कलावंत आयत्यावेळी दोन शब्दही बोलू शकत नाहीत. हातातील स्क्रीप्टमध्य दिलेल्या डॉयलॉगखाली अंडरलाईन करतात आणि तेवढेच वाचतात. सूंपूणर््ा स्क्रीप्टच महत्वाची असते हे ते विसरतात, असा टोला त्यांनी लगावला.