शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

खोट्या तक्रारी, ईडीची बनावट नोटीस दाखवून अधिकारी - उद्योजकांना खंडणीसाठी त्रास देणाऱ्या भाईंदरच्या विकासकावर मकोका लावण्याचे पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 15:25 IST

दानवे यांनी पत्रात म्हटले आहे कि, राजू शाह यांनी गेल्या अनेक वर्षां पासून महापालिका व  पोलीस अधिकारी, व्यावसायिक, उद्योजक यांना आर्थिक हेतूने त्रास दिला आहे. शाह वर १२ केस असून काही प्रकरणात शिक्षा झाली आहे. उच्च न्यायालय व लोकायुक्त यांनी ब्लॅकमेलर म्हणून त्यांच्या तक्रारी फेटाळून लावल्या आहेत. 

मीरारोड -  खोट्या तक्रारी करून नंतर त्या मागे घेणे, अधिकाऱ्यांना खंडणी साठी त्रास देणे, ईडीची  बनावट नोटीस दाखवून धमकावणे अश्या विविध गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या भाईंदरच्या राजू शाह उर्फ राजू जैन उर्फ राजेंद्र जैन ह्या व्यक्ती विरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अर्थात मकोका खाली कारवाई करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे केली आहे. 

 दानवे यांनी पत्रात म्हटले आहे कि, राजू शाह यांनी गेल्या अनेक वर्षां पासून महापालिका व  पोलीस अधिकारी, व्यावसायिक, उद्योजक यांना आर्थिक हेतूने त्रास दिला आहे. शाह वर १२ केस असून काही प्रकरणात शिक्षा झाली आहे. उच्च न्यायालय व लोकायुक्त यांनी ब्लॅकमेलर म्हणून त्यांच्या तक्रारी फेटाळून लावल्या आहेत. 

ईडीच्या चुकीच्या नोटीस प्रकरणी शाह यांना अटक झाली आहे. महापालिका अधिकाऱ्यां विरुद्ध खंडणी मागणे, खोट्या तक्रारी दाखल करणे व नंतर त्या मागे घेणे अश्या पद्धतीने गुन्हेगारी कारवाया केल्या आहेत. आदिवासींची जमीन हडपणेचा गंभीर आरोप, हमीरमल टॉवर हि अनधिकृत इमारत उभारली आहे. 

नागरिक, संस्था यांनी शाह विरुद्ध तक्रारी करून देखील कोणतीच कारवाई न केल्याने प्रशासन व पोलिसांवर नागरिकांचा विश्वास कमी होत आहे. या प्रकरणी चौकशी करून मकोका लावण्याची मागणी विरोधेपक्ष नेते दानवे यांनी मुख्यमंत्री यांच्या कडे केली आहे.  

तर राजू शाह यांनी सांगितले कि, दानवे यांची तक्रार खोटी असून आपण दोन्ही सभागृहांच्या सभापतीं कडे दानवे यांची तक्रार केली आहे. एनिमी प्रॉपर्टी घोटाळा मांडण्यासाठी दानवे यांचे सचिव एच. एस. मोरे यांनी पैसे, मोबाईल, दारूच्या बाटल्या मागितल्याचे व्हॉट्सएप स्क्रिनशॉट तक्रारी सोबत दिले आहेत. युएलसी व एनिमी प्रॉपर्टी घोटाळा दडपण्यासाठी पैसे पुरवल्याचे समजल्याचे शाह यांनी तक्रारीत नमूद केलं आहे.