शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

...तर महापालिकेसमोर बाप्पाची महाआरती करू; ठाणे जिल्हा गणेशोत्सव समितीचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 16:32 IST

ठाणे जिल्हा गणेशोत्सव समिती गणेशोत्सव समितीची किसननगर येथे आज दुपारी बैठक संपन्न झाली.

ठाणे : शासनाने उत्सवांच्या बाबतीत आपली भूमिका लवकर जाहीर न केल्यास सरकारला जागे करण्यासाठी पुढील २० जुलै आषाढी एकादशीच्या दिवशी ठाणे महानगर पालिकेसमोर आपले आराध्य दैवत गणपती बाप्पाची महाआरती घेण्यात येईल यात ठाण्यातील सर्व गणेशोत्सव मंडळे उपस्थित राहून आपल्या भावना व्यक्त करतील असा इशारा ठाणे जिल्हा गणेशोत्सव समितीने प्रशासनाला दिला. 

ठाणे जिल्हा गणेशोत्सव समिती गणेशोत्सव समितीची किसननगर येथे आज दुपारी बैठक संपन्न झाली. यावेळी मंडळाने वरील भूमिका एकमताने घेतली. आज झालेल्या मिटिंगमध्ये ठाण्यातील ७२ मंडळे ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने उपस्थित होती. आज झालेल्या मिटिंगमध्ये गणेशोत्सव मंडळांनी घेतलेले खालील निर्णय पुढील प्रमाणे.

१. गणेश मूर्तीच्या उंचीवरील बंधने शिथिल करावीत.२.कोरोनाचे सर्व नियम पाळून गणेश आगमन व विसर्जन मिरवणूक काढण्यासाठी परवानगी देऊन सहकार्य करावे.३.उत्सवासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या या सालाबाद प्रमाणे देण्यात याव्यात व यासाठी एक खिडकी योजना प्राधान्याने राबविण्यात यावी.४.मंडळांच्या सर्व कार्यकर्त्यांचे लसीकरण उत्सवांच्या आधी होण्यासाठी विशेष तरतूद करावी.५.मंडळांना विश्वासात घेऊनच २०२१ ची सुधारित नियमावली जाहीर करावी व मंडळांची व प्रशासनाची हि बैठक लवकरच लावावी.

आतापर्यंत गणेशोत्सव मंडळांनी सरकारला व पालिका प्रशासनाला संयम ठेवून सहकार्य केले आहे परंतू सरकार दाद नसेल तर आम्हाला आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल असे समितीचे अध्यक्ष समीर सावंत म्हणाले.

टॅग्स :ganpatiगणपतीThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका