शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने सूत्र हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
5
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
6
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
7
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
8
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
9
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
10
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
11
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
12
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
13
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
14
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
15
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
16
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
17
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
18
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
19
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
20
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान

निवडणुकीत शिवसेनेला ‘चिल्लर’ मोजायला लावू , सकल मराठा मोर्चाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 23:41 IST

शिवशिल्पाच्या दुर स्तीमध्ये ठामपाकडून दिरंगाई केली जात आहे. यासंदर्भात निवेदन देण्यासाठी गेलेल्या सकल मराठा समाजाच्या मंगळवारी पदाधिका-यांना नरेश म्हस्के यांनी ‘चिल्लर’ असे संबोधून धक्काबुक्की केली होती.

ठाणे : ठामपाचे सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी ‘हिम्मत असेल तर आयुक्तांकडे जा’ असे आव्हान मराठ्यांना दिले होते. आम्ही आमची हिम्मत दाखवून शिवशिल्पासाठी १० लाखांचा निधी मंजूर करून घेतला. पण, त्यानिमित्ताने शिवरायांच्या नावावर राजकारण करणाऱ्यांची किंमत समस्त ठाणेकरांना दिसली, अशा शब्दांत सकल मराठा समाजाने पलटवार केला आहे. शिवाय, समाजातील पदाधिकाऱ्यांना चिल्लर लेखणाºया म्हस्केंनी माफी मागावी, अन्यथा विधानसभा निवडणुकीत शिवसेनेलाच चिल्लर मोजायला लावू, असा इशाराही बुधवारी मराठा समाजाच्या पदाधिका-यांनी दिला.शिवशिल्पाच्या दुर स्तीमध्ये ठामपाकडून दिरंगाई केली जात आहे. यासंदर्भात निवेदन देण्यासाठी गेलेल्या सकल मराठा समाजाच्या मंगळवारी पदाधिका-यांना नरेश म्हस्के यांनी ‘चिल्लर’ असे संबोधून धक्काबुक्की केली होती. त्यानंतर, या पदाधिकाºयांनी आयुक्त संजीव जयस्वाल यांची भेट घेऊन या शिवशिल्पासाठी निधी मंजूर करून घेतला. यासंदर्भात मराठा मोर्चाची भूमिका मांडण्यासाठी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत कैलाश म्हापदी यांनी ही टीका केली. यावेळी रमेश आंबरे, अ‍ॅड. संतोष सूर्यराव, दत्ता चव्हाण, अविनाश पवार, अजय सकपाळ, दीपक पालांडे, धनंजय समुद्रे, प्रवीण कदम, सुजय हुले, अतुल मालुसरे आदी उपस्थित होते.शिवरायांचे नाव घेऊन सत्तेवर येणाºया या लोकांना आपल्या नजरेसमोर पडझड झालेले शिवशिल्प दिसत नाही, हे दुर्दैव आहे. प्रशासनाकडून काम करून घेणे, हे त्यांचे कर्तव्य असते. मात्र, ते जमत नसल्यामुळेच सनदशीर आणि संविधानिक मार्गाने आंदोलन करणाºयांना मारहाण करण्याची धमकी दिली जात आहे. सर्वात गंभीर म्हणजे महापौरांना भेटण्यासाठी सकल मराठा समाजाचे पदाधिकारी गेले असताना त्यांच्या दालनात येऊन अशा पद्धतीने दादागिरी करणे सभागृह नेत्याला शोभणारे नाही.आम्ही शिवशिल्पाच्या दुरु स्तीची मागणी करायला गेलो होतो. मात्र, त्यांनी ही मागणी जाणून घेण्याआधीच हाणामारीची भाषा केली. यावरून या लोकांच्या मनात शिवाजी महाराजांबद्दल किती प्रेम आहे, हे दिसून येत आहे. मते मागण्यासाठी मराठा समाजाच्या दारात भिकाºयासारखे येणारे हे लोक आज शिवरायांच्या वैचारिक वारसांना ‘चिल्लर’ असे म्हणत असतील, तर त्याचा हिशेब आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चुकता केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. त्यामुळे म्हस्के यांनी माफी मागावी, असेही त्यांनी सांगितले.दुसरीकडे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला वेळोवेळी मदत केली होती. परंतु, त्यांनी दिलेली शपथ आता सुटली असून त्यांच्याबरोबर आमचा काहीही संबंध असणार नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले....तर सहीसलामत गेले नसतेनरेश म्हस्के यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळले असून मराठा समाजाविषयी कोणत्याही प्रकारचे अनुद्गार काढले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मी चिल्लर असा उल्लेखदेखील केला नव्हता. कैलाश म्हापदी यांनी माझ्या प्रभागात येऊन माझ्या आणि शिवसेनेच्या विरोधात अनेक भाषणे केली आहेत. मात्र, सर्वांचे डिपॉझिट जप्त करून मी निवडून आलो आहे. महिला असलेल्या महापौरांना चिल्लर देणे योग्य नसून जर असे केले असते, तर ते दालनाच्या बाहेर सहीसलामत गेलेच नसते. या माझ्या वक्तव्यावर मी आजही ठाम असल्याचे म्हस्के यांनी स्पष्ट केल्याने हा वाद आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत.

टॅग्स :thaneठाणे