शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

‘मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की अकरा....’; घर गाठण्याकरिता प्रत्येकाची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 00:26 IST

ठाणे जिल्ह्यात नववर्षाला रस्ते सुनसान : घर गाठण्याकरिता प्रत्येकाची धडपड

ठाणे : नवीन वर्षाचे स्वागत करण्याकरिता हॉटेल, पब्ज, धाबे येथे जमणारे पहाटेपर्यंत धिंगाणा करतात. रस्त्यांवर चित्कार करीत अनेक जण फटाक्यांची आतषबाजी पाहतात. सोसायट्यांच्या गच्चीवर उशिरापर्यंत गायनाचे व भोजनाचे कार्यक्रम हास्य-विनोदाच्या साथीने रंगतात. मात्र, यंदा हॉटेलात जेवण घेणारे घड्याळाकडे वरचेवर पाहत घास गिळत होते. रस्त्यावर चिटपाखरू नव्हते व जे होते ते पोलिसांचा दंडुका पडू नये, याकरिता दुचाकी पिटाळत होते. गच्चीवर अंधार तर घराघरात टीव्हीचा हाय व्हॉल्युम हे यंदाचे चित्र होते.

दिवाळीत खरेदीकरिता जिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरात हजारो लोक रस्त्यावर उतरले. मात्र, तरीही कोरोनाचे रुग्ण तुलनेनी फारसे वाढले नाहीत. नवीन वर्षाच्या स्वागताकरिता पुन्हा हजारो लोक रस्त्यावर उतरले, तर कोरोना वाढण्याची भीती असल्याने सरकारने कडक संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यातच ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळल्याने व ब्रिटनहून शेकडो नागरिक जिल्ह्यात आल्याने भीतीचे वातावरण होते. अर्थात, रात्रीच्या संचारबंदीवर टीका झाली, तर नववर्षाच्या स्वागतामध्ये हॉटेल व्यावसायिकांना व्यवसायाची संधी दिसत असल्याने ते हिरमुसले झाले.

या पार्श्वभूमीवर संचारबंदी किती प्रभावीपणे राबवली जाईल, याबाबत शंका व्यक्त होत होत्या. थर्टी फर्स्टला मार्गशीर्षातील गुरुवार आल्याने अनेकांनी सेलिब्रेशनचे बेत रद्द केले. मात्र,  पोलीस पीपीई किट घालून प्रत्येक प्रवाशाची नोझल वापरून तपासणी करणार, हे स्पष्ट झाल्यावर गेले काही दिवस कोरोनामुळे तळीरामांची तपासणी बंद झाल्याने सैलावलेले मद्यप्रेमी सावध झाले. अनेकांनी अकरापूर्वी आपली पार्टी उरकली किंवा बंद खोलीत मैफल जमविली.  

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे