शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सावरकर संमेलनाकडे तरुणांची पाठ

By admin | Updated: April 25, 2017 00:06 IST

शहरात झालेल्या एकोणतिसाव्या अ.भा. सावरकर साहित्य संमेलनाकडे आयोजकांच्या उदासीनतेमुळे तरुणांनी पाठ फिरवल्याचे दिसले.

ठाणे : शहरात झालेल्या एकोणतिसाव्या अ.भा. सावरकर साहित्य संमेलनाकडे आयोजकांच्या उदासीनतेमुळे तरुणांनी पाठ फिरवल्याचे दिसले. गडकरी रंगायतन येथे चाललेल्या या तीनदिवसीय संमेलनात केवळ ज्येष्ठ नागरिकांचीच उपस्थिती होती. तरुणांचा सहभाग नगण्य असल्याचे चित्र तीन दिवस पाहायला मिळाले. २१ ते २३ एप्रिलदरम्यान हे संमेलन झाले. तीन दिवस चाललेल्या या संमेलनात तरुणांची गर्दी खेचून आणण्यास आयोजक पुरते अपयशी ठरले. सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असलेल्या शहरात विविध साहित्य संमेलने पार पडली आहेत. या संमेलनांना तरुणांची बऱ्या प्रमाणात उपस्थिती होती. मात्र, सावरकर संमेलनात ती नव्हती. या संमेलनाला उपस्थित असलेला वर्ग पाहून हे संमेलन केवळ ज्येष्ठांचेच होते का, असा प्रश्न सांस्कृतिक वर्तुळातून उपस्थित होत आहे. तरुणांचा सहभाग अधिकाधिक असावा, यासाठी आपल्या घरापासून सुरुवात करा, आपल्या घरातील मुलांना संमेलनात सहभागी करा, असे आवाहन आयोजकांनी संमेलनपूर्व बैठकीत केले होते. परंतु, या आवाहनाला तरुणांचा प्रतिसाद मिळालाच नाही. तसेच, या संमेलनात जास्तीतजास्त तरुण सहभागी होतील, त्यांचा सहभाग वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातील, असे त्यांनी जाहीर केले होते. त्यासाठी १४ते २० एप्रिलदरम्यान संमेलनपूर्व कार्यक्रमही राबवण्यात आले. परंतु, मुख्य संमेलन असो वा संमेलनपूर्व कार्यक्रम, यात तरुणांच्या सहभागावर प्रश्नचिन्ह होते. तरुणांची गर्दी खेचण्यासाठी शाळा, महाविद्यालयांत जागृती होणे गरजेचे होते. मात्र, तेथे आयोजक पोहोचलेच नसल्याने त्यांनाही या संमेलनाची माहिती मिळाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे सावरकरांचे विचार तरुणांपर्यंत पोहोचवण्याच्या आयोजकांच्या उद्देशालाच कात्री लागली. शुक्रवारी काढलेल्या ग्रंथदिंडीतही तरुणांनी पाठ फिरवली होती. त्यात हाताच्या बोटांवर मोजण्याइतके ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. परिसंवाद, भाषणे, सांस्कृतिक कार्यक्रमांत तरुणाई सहभागी होण्याची अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र, ज्येष्ठ नागरिकच तिन्ही दिवसांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहिले. काही तर कार्यक्रमाच्या अधूनमधून वामकुक्षी घेताना दिसले. भारताची संरक्षणसिद्धता, सावरकर आजच्यासंदर्भात, सावरकरांचे साहित्यविश्व, महाकवी सावरकर, महाराष्ट्रदर्शन, भारतातल्या समाजसुधारणा- विविध प्रयत्न, सावकरांवरील आक्षेप व निराकरण, अल्पज्ञात सावरकर हे कार्यक्रम तरु णाईला प्रेरणा मिळावी, याउद्देशाने आयोजित केले होते. ग्रंथदालनालाही तरुणांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाला. शहरातही या संमेलनाविषयी जागृती न झाल्याने ना विद्यार्थी, ना तरुण ना मध्यमवयातील वर्ग येथे होता. ‘हे संमेलन तरुणांना वाव देण्यासाठी होते. सावरकरांच्या विचारांचा प्रचारप्रसार तरुणांपर्यंत पोहोचवून त्यांना सहभागी करून घेतले’ असे समारोप सोहळ्याच्या दिवशी व्यासपीठावरून सांगणारे आयोजक तरुणवर्ग उपस्थित नसताना कोणत्या तरुणांना उद्देशून बोलत होते, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. (प्रतिनिधी)