शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

वृक्ष लागवडीच्या जन आंदोलनासाठी कोकणात वातावरण तापत ठेवण्याचे अधिकाऱ्यांना धडे

By सुरेश लोखंडे | Updated: December 27, 2018 19:41 IST

महसूल, सीडको, जेएनपीटी आदींच्या सुमारे २०० हेक्टरभूखंडावर कांदळवन लागवडीचे नियोजन आहे. त्यासाठी जमीन ताब्यात घेतली जात आहे. १३ कोटी लागवडीच्या कार्यक्रमावेळी सहा लाख कांदळवन लागवडीच उद्दीष्ठ असताना आठ लाख लागवड झाली. आताही २०० हेक्टरवरील लागवडीची तयार नोव्हेंबरमध्ये सुरू असल्याचे यावेळी नमुद करण्यात आले. सामाजिक वनीकरण विभागाकडून सिंधुदूर्गमध्ये ६८ किमी. रस्त्यांच्या दुतर्फा, ४१ किमी. रेल्वे लाइन लागत, चार किमी.च्या कालव्याच्या दुतर्फा आदी सुमारे ३२४ किमी.च्या रस्त्यांसह जंगल क्षेत्रात वृक्ष लागवडीचे नियोजन केले

ठळक मुद्देसुमारे ३३ कोटी वृक्ष यंदा लागण्याची शक्यताजि ल्ह्यांमधील कार्यक्रमांसाठी वन अधिकाऱ्यांनी अवर्जुन उपस्थिती लावावी आतापर्यंत लागवड केलेल्या वृक्षांचा पहाणी दौरे आयोजित करा,वृक्ष लागवडीचे आकडे केवळ कागदांवर असल्याचा संशय दूर करा

सुरेश लोखंडेठाणे : वृक्ष लागवडीसाठी जन आंदोलन तयार करण्यासाठी कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये आतापासून वातावरण निर्मिती तयार करा. विविध कार्यक्रम घेऊन वातारवण सतत तापत ठेवा. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी (सीईओ) आदींना तालुक्यांमध्ये ठिकठिकाणी बैठका घेण्यास भाग पाडून प्रशासनासह राजकीय, सामाजिक संघटना, शेतकरी आदीना वृक्ष लागवडीस प्रोत्साहन करण्यासाठी वन विभाग सचिव विकास खारगे यांनी अधिकाऱ्यांना येथील कोकण विभागीय आढावा बैठकीत गुरूवारी धडे दिले.५० कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाच्या पूर्व तयारीसाठी येथील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आज कोकण विभागीय आढावा बैठक पार पडली. दोन सत्रातही बैठक पार पडली. यासाठी ठाणेसह मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग आदी जिल्ह्यातील वन खात्यासह सामाजिक वनीकरण, कांदळवन विभाग आदींच्या अधिकाऱ्यांची कोकण विभागीय बैठक घेऊन खारगे यांनी वृक्ष लागवडीच्या कामाचा आढावा घेत अधिकाऱ्यांना लोकचळवळीसाठी धडे दिले. आतापर्यंत लागवड केलेल्या वृक्षांचा पहाणी दौरे आयोजित करा, रोपांची वाढ होत आहेत. झाडे जिवंत आहेत, त्यांची निगा राखली जात आहे, संगोपन करण्यासाठी अधिकारी सदैव सतर्क असल्याची जाणीव करून देण्यासाठी नागरिकांसह सामाजिक, शैक्षणिक, राजकीय संघटनांचे दौरे आयोजित करण्याची तंबी खारगे यांनी अधिकाऱ्यांना दिली.वृक्ष लागवडीचे आकडे केवळ कागदांवर असल्याचा संशय दूर करा,वस्तुस्थिती दाखवण्यासाठी खासदार , आमदारांसमावेत नागरिकांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करा,जि ल्ह्यांमधील कार्यक्रमांसाठी वन अधिकाऱ्यांनी अवर्जुन उपस्थिती लावावी. त्यातील भाषणामध्ये वृक्ष लागवडीचे महत्व पटवून देण्याची संधी मिळवण्यासाठी देखील त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले आहे. यावेळी कांदळवन लागवडीसह रस्त्यांच्या दुतर्फा, खाडी किनारी, मोकळ्या जागा, जंगल परिसरात वृक्ष लागवडीसाठी आधीच मनुष्यबळाचे नियोजन करा, त्यांची यादी तयार ठेवा, खड्डे खोदण्यासह रोपवाटीकांमध्ये मोठ्याप्रमाणात रोपे तयार ठेवा कोणात सुमारे ३३ कोटी वृक्ष यंदा लागण्याची शक्यताही त्यांनी यावेळी व्यक्त केली.महसूल, सीडको, जेएनपीटी आदींच्या सुमारे २०० हेक्टरभूखंडावर कांदळवन लागवडीचे नियोजन आहे. त्यासाठी जमीन ताब्यात घेतली जात आहे. १३ कोटी लागवडीच्या कार्यक्रमावेळी सहा लाख कांदळवन लागवडीच उद्दीष्ठ असताना आठ लाख लागवड झाली. आताही २०० हेक्टरवरील लागवडीची तयार नोव्हेंबरमध्ये सुरू असल्याचे यावेळी नमुद करण्यात आले. सामाजिक वनीकरण विभागाकडून सिंधुदूर्गमध्ये ६८ किमी. रस्त्यांच्या दुतर्फा, ४१ किमी. रेल्वे लाइन लागत, चार किमी.च्या कालव्याच्या दुतर्फा आदी सुमारे ३२४ किमी.च्या रस्त्यांसह जंगल क्षेत्रात वृक्ष लागवडीचे नियोजन केले. यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातील आढावा सुरू असतानाच्या प्रजेंटेशनमध्ये अकोला महापालिकेच्या पॉप्लेटचे चित्रिकरण चुकीने दाखवण्यात आल्याचे यावेळी निदर्शनात आले.यंदाच्या वृक्ष लागवडीसाठी आतापासून जोरदार तयारी करण्याचे आदेश जारी झाले आहेत. त्यासाठी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांचे सहकार्य घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. एप्रिलपर्यंत लोकसभेच्या निवडणुका पूर्ण होण्याची शक्यता खारगे यांनी यावेळी व्यक्त केली. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडून त्यास प्राधान्य देण्यात येईल. तरी देखील त्यांची सतत भेट घेऊन कार्यक्रमाच्या नियोजनाची कल्पना देण्याचे आदेशही त्यांनी वनअधिकाऱ्यांसह सीएफओ, डीएफओ आदींना दिले. वृक्ष लागवड कार्यक्रमांच्या तीन बैठकांपैकी पहिली बैठक आज दोन सत्रात पार पडत असल्याचे खारगे यांनी नमुद करून दुसरी बैठक एप्रिलच्या दुसऱ्यां  आणि शेवटची बैठक मंत्री, खासदार, आमदार यांच्याबरोबर होणार आहेत. त्यासाठी अधिकाऱ्यांनी वृक्ष लागवडीच्या या कार्यक्रमात सतत पॅसीव, अ‍ॅक्टीव आणि प्रो अ‍ॅक्टीव राहण्याचा मंत्र खारगे यांनी यावेळी दिला.

 

टॅग्स :thaneठाणेcollectorजिल्हाधिकारीforest departmentवनविभाग