शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

अंगारकी असूनही टिटवाळा गणपती मंदिरात तुरळक गर्दी; पूजा साहित्य विक्रेते चिंतेत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 17:00 IST

फारशी विक्री न झाल्याने विक्रेते

- उमेश जाधवटिटवाळा:अंगारकी चतुर्थी निमित्त टिटवाळा येथील महागणपती मंदिरात बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची मंगळवारी तुरळक गर्दी दिसून आली. सोमवारी रात्री 12 वाजता गणपती देवाला दुग्ध अभिषेक करून आरती नंतर मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी खुले करण्यात आले. अंगारकी संकष्टी चतुर्थी आल्याने मंदिरात विघ्नहर्त्याच्या दर्शनासाठी भाविकांच्या गर्दीचा महापूर येईल अशी मंदिरातील पुजारी व येथील पूजा साहित्य विक्रत्यांची भावना होती. मात्र आज मंदिरात अतिशय कमी गर्दी पाहायला मिळाली.    सोमवारी रात्री दहा वाजल्यापासून मंदिर विश्वस्तांनी अंगारकी चतुर्थी म्हणून देवाच्या पुजेची तयारी सुरू केली होती.  रात्री 12 वाजता देवाला अभिषेक केल्यावर आरतीनंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. गणपती बाप्पा मोरया... मंगल मूर्ती मोरया.. उंदीर मामा की जय.. या घोषणांनी मंदिर, मंदिर परिसर व सभामंडप दणाणून गेले होते. रात्री पासूनच मंदिर सभामंडपातील दर्शन बारीत भाविकांनी काही प्रमाणात गर्दी केली होती. तसेच सकाळी सहा वाजल्यापासून मंदिर काही प्रमाणात भाविकांनी हजेरी लावली. मात्र नेहमीप्रमाणे आवारातील व तलावा सभोवतालची दर्शन बारी पूर्णपणे भाविकांनी भरली नाही. रात्रीपासूनच पावसाने हजेरी लावल्याने आणि त्यात रेल्वेची लोकल सेवाही उशिराने धावत असल्याने भाविकांची गर्दी कमी असल्याचे मंदिर विश्वस्तांनी सांगितले. 

दुपारी 12 नंतर तुरळक प्रमाणात का होईना गर्दीत वाढ झाली. कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, बदलापूर, अंबरनाथ या उपनगरांसह मुंबई व ठाणे या शहरातील भाविकांनी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी हजेरी लावली होती. अंगारकी चतुर्थी असल्या कारणाने येथील पूजा साहित्य विक्रेत्यांनी हार, फुले, मोदक, नारळ व इतर पुजेचे साहित्य जास्त प्रमाणात मागवले आहे. मात्र फारशी विक्री न झाल्याने बरेचसे साहित्य पडून आहे. टिटवाळा पोलीस ठाण्याच्या वतीने मंदिर परिसरात 40 कर्मचारी व 8 अधिकारी असा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मंदिर सुरक्षा रक्षक, अनिरुद्ध बापू साधक व काही सामाजिक संस्थांचे साधकदेखील याठिकाणी आपले कर्तव्य बजावताना दिसत होते. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची अग्निशमन दलाची व आरोग्य खात्याची यंत्रणादेखील मंदिर प्रांगणात सज्ज होती. रात्री उशिरापर्यंत मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे. संध्याकाळी भाविकांची गर्दी वाढली तर वाढेल अशा प्रकारचे मत मंदिर विश्वस्त योगेश जोशी यांनी लोकमत'शी बोलताना व्यक्त केले.    

नेहमीच्या अंगारकी चतुर्थीला ज्या प्रमाणे गर्दी असते त्याच्या पंचवीस टक्केदेखील गर्दी आज नसल्याने आमच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. मोठ्या प्रमाणात पूजा साहित्य आणले आहे ते अंगावर पडणार असून‌ आम्हाला नुकसानाला सामोरे जावे लागणार आहे. गणेश दलाल, पुजा साहित्य विक्रेता.