ठाणे: आंदोलनकर्त्या मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ठाणे पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून नोटीसा पाठविल्या आहेत. या नोटीशीनंतरही जर आंदोलनामध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष भाग घेऊन कायदा सुव्यवस्था बिघडविणा-यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा या नोटीशीमध्ये देण्यात आला आहे.ठाणे शहरातील सर्वच दुकानांवर मराठी भाषेत पाटया लावण्याच्या मुद्द्यावरून व्यापारी तसेच रेल्वे परिसर अडविणा-या फेरीवाल्यांविरुद्ध सुरु केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांनी महाराष्ट्र नविनर्माण सेनेच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना नोटीसा पाठविल्या आहेत. या आंदोलनामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्याने प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून पोलिसांनी ही उपाययोजना केली आहे. नोटीसीनंतरही आंदोलनाद्वारे कायदा आणि सुव्यवस्था बिघडवली तर संबंधितांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. फौजदारी दंडप्रक्रि या संहिता कलम १४९ नुसार ही नोटीस देण्यात आली आहे.
यापुढे आंदोलन केल्यास होणार कायदेशीर कारवाई: मनसेला ठाणे पोलिसांची नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 22:31 IST
एक कोटींच्या जामीनाला मनसेने आव्हान देताच ती रक्कम एक लाख रुपये करण्यात आली. तर आता मराठी पाटया न लावणाºया दुकानदारांवर मनसेने हल्लाबोल केल्यामुळे पोलिसांनी पुन्हा कायदेशीर नोटीस बजावली आहे.
यापुढे आंदोलन केल्यास होणार कायदेशीर कारवाई: मनसेला ठाणे पोलिसांची नोटीस
ठळक मुद्दे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह अनेकांना नोटीसापुन्हा आंदोलन केल्यास कारवाईचा इशाराआंदोलनामुळे कायदा सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता