शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

गर्दीच्या वेळी विशेष लोकल सोडा; मनसेचे रेल्वेला निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 01:07 IST

कल्याण दिशेकडील पुलाचे काम तातडीने मार्गी लावा

डोंबिवली : मध्य रेल्वेवरील वाहतूक महिनाभरापासून विलंबाने धावत असल्याने कल्याण-डोंबिवली आणि कर्जत-कसारा मार्गावरील प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. कार्यालयात लेटमार्क लागत असल्याने वेतनात कपात होत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना दिलासा देण्यासाठी गर्दीच्या वेळेत डोंबिवली आणि कल्याणहून विशेष लोकल सोडाव्यात, अशी मागणी मनसेच्या डोंबिवली शिष्टमंडळाने स्थानक प्रबंधक के. ओ. अब्राहम यांच्याकडे मंगळवारी केली.मनसेच्या शिष्टमंडळाने विविध मागण्यांसदर्भात स्थानक प्रबंधकांची भेट घेत निवेदन दिले. त्यावेळी झालेल्या चर्चेत गर्दीचे योग्य नियोजन करावे, जेणेकरून प्रवाशांचे हाल कमी होतील. तसेच डोंबिवलीत विशेष अधिकारी नेमून त्याच्याद्वारे परिस्थिती नियंत्रणात येईल, याची काळजी घ्यावी, अशी मागणी मनसेने केली. स्थानकातील कल्याण दिशेकडील पादचारी पुलाचे काम सुरू असल्याने प्रवासी आणि पूर्व-पश्चिमेला ये-जा करणारे पादचारी मधल्या पुलाचा वापर करत आहेत. मात्र, टीसींनी त्यांना अडवू नये. तसेच कल्याण दिशेकडील पुलाची तातडीने दुरुस्ती करून तो प्रवाशांसाठी खुला करावा, अशीही मागणी करण्यात आली. लोकलच्या वेळापत्रकात सुधारणा न झाल्यास आणि विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती न केल्यास मनसेचे शिष्टमंडळ रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांची भेट घेईल, असेही सांगण्यात आले.दरम्यान, या शिष्टमंडळात मनसेचे शहर अध्यक्ष राजेश कदम, जिल्हा संघटक राहुल कामत, उपजिल्हा सचिव निलेश भोसले, महिला शहर अध्यक्षा मंदा पाटील, स्मिता भणगे आदी उपस्थित होते.

टॅग्स :central railwayमध्य रेल्वेMNSमनसे