शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

नेते सुसाट, तर कार्यकर्ते मोकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 00:05 IST

कार्यकर्त्यांवर कारवाईस टाळाटाळ : पक्षश्रेष्ठींचे बंडखोरांना अप्रत्यक्ष पाठबळ

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील १८ पैकी पाच मतदारसंघांत प्रमुख पक्षांत मोठी बंडखोरी झाली असून सर्वच पक्षांच्या पक्षश्रेष्ठींनी तुरळक अपवाद वगळता बंडखोरांवर कारवाई न केल्याने नेते सुसाट, तर कार्यकर्ते मोकाट असे चित्र दिसत आहे.

जिल्ह्यात मुंब्रा-कळवा मतदारसंघात शिवसेनेच्या दीपाली सय्यद यांच्याविरोधात प्रकाश जंगम यांनी बंडखोरी केली आहे. मात्र, त्यांच्यावर शिवसेनेने अद्याप कोणतीही कारवाई न केल्याने त्यांनी आपला प्रचार जोमाने सुरू ठेवला आहे. सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या कल्याण पश्चिम मतदारसंघात तिकीट नाकारल्याने भाजपचे विद्यमान आमदार नरेंद्र पवार यांनी शिवसेनेचे विश्वनाथ भोईर यांच्याविरोधात बंडखोरी केली असून त्यांनी हकालपट्टीची कारवाई टाळण्यासाठी पक्षाचा राजीनामा दिला असला, तरी त्यांच्यासोबत कल्याणमधील भाजपच्या अनेक नगरसेवकांसह पदाधिकारी उघडउघड प्रचार करीत आहेत. यात आजी- माजी उपमहापौर, सरचिटणीसांसह महिला मोर्चाच्या पदाधिकारी, परिवहन सदस्य, वॉर्ड अध्यक्ष, मंडल अध्यक्षांचा समावेश आहे. यातील काही ठिकाणी पक्षाने नवे वॉर्ड अध्यक्ष नियुक्त केले असले, तरी इतर मात्र मोकाट आहेत.

कल्याण पूर्वेत उल्हासनगर येथील शिवसेनेचे महापालिकेतील विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे यांनी भाजप उमेदवार गणपत गायकवाड यांच्याविरोधात बंड केले असून त्यांच्यासोबत पक्षाचे १५ नगरसेवक प्रचार करीत आहेत. त्यांनी आपले राजीनामेही पक्षाकडे पाठवले असले, तरी ते न स्वीकारता पक्षाने मूकसंमती दिल्याचे दिसत आहे. उल्हासनगरातही राष्ट्रवादीच्या ज्योती कलानींच्या प्रचारात त्यांचे पुत्र ओमी कलानी यांच्या टीमचे १५ नगरसेवक छुपेपणाने उतरले असून भाजपने तिघांनाच नोटीस बजावल्याची चर्चा आहे. यामुळे अधिकृत उमेदवार कुमार आयलानी यांचे टेन्शन वाढले आहे.मीरा-भार्इंदरमध्येही गीता जैन यांनी नरेंद्र मेहता यांच्याविरोधात बंडखोरी केल्याने पक्षाने त्यांची हकालपट्टी केली असली, तरी त्यांच्यासोबत पक्षाचे अनेक पदाधिकारी मेहतांविरोधात प्रचार करीत आहेत. बेलापूर मतदारसंघात भाजपच्या मंदा म्हात्रेंविरोधात अर्ज दाखल केलेले शिवसेनेचे विजय माने यांनी अखेरच्या टप्प्यात बंडाची तलवार म्यान करून म्हात्रेंच्या प्रचारात सहभाग घेतला आहे.घटक पक्षांचेही अभयमुरबाडमध्ये भाजपच्या किसन कथोरेंविरोधात आरपीआयच्या एका गटाने बंड पुकारले आहे. हीच गत अंबरनाथ आणि उल्हासनगरमध्येही आहे. आघाडीपेक्षा युतीत बंडखोरी जास्त असून, घटक पक्षांनी बंडखोरांवर कारवाई न करता अप्रत्यक्ष पाठबळ दिले आहे.यंदाच्या विधानसभा निवडणुकीत बंडखोरांचे मोठे पीक जवळपास सर्वच पक्षांमध्ये फोफावले आहे. बंडखोरीचे प्रमाण एवढे जास्त आहे की, कारवाई करावी तरी कुणाकुणावर, असा प्रश्न बहुतांश मोठ्या पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांना पडला आहे.यंदाच्या विधानसभा निवडणुकीत बंडखोरांचे मोठे पीक जवळपास सर्वच पक्षांमध्ये फोफावले आहे. बंडखोरीचे प्रमाण एवढे जास्त आहे की, कारवाई करावी तरी कुणाकुणावर, असा प्रश्न बहुतांश मोठ्या पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांना पडला आहे.

टॅग्स :thane-acठाणे शहर