शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आघाडी झाली पण मनोमिलनाचा अभाव

By admin | Updated: January 30, 2017 02:00 IST

परस्परांबद्दल असलेली नाराजी, क्षमतेबद्दल शंका यामुळे गोलमैदानातील भाजपा, ओमी कलानी आणि रिपाइंच्या विकास आघाडीचे शक्तिप्रदर्शन फसले.

सदानंद नाईक, उल्हासनगरपरस्परांबद्दल असलेली नाराजी, क्षमतेबद्दल शंका यामुळे गोलमैदानातील भाजपा, ओमी कलानी आणि रिपाइंच्या विकास आघाडीचे शक्तिप्रदर्शन फसले. सभेच्या ठिकाणी ओमी कलानी यांनी हाती तलवार घेऊन केलेला प्रवेश, सभा सुरू होईपर्यंत अर्ध्याअधिक रिकाम्या झालेल्या मैदानामुळे चर्चेला ऊत आला. तिन्ही पक्षांत आघाडी झाली, मात्र नेत्यांचेच मनोमिलन झाले नसल्याचे यातून दिसून आले. उल्हासनगरातील राजकारण गेले काही महिने ओमी कलानी टीम आणि भाजपाभोवती फिरते आहे. पक्षातील एका गटाची नाराजी लक्षात घेऊन ओमी टीमला प्रवेश न देता भाजपाने त्यांना सोबत घेत विकास आघाडी तयार केली. दोन्ही पक्षांतील विद्यमान नगरसेवकांना उमेदवारीचे आश्वासन देत फिफ्टीफिफ्टीचा फॉर्म्युला स्वीकारण्यात आला. गोलमैदान बुक करून भाजपा आणि ओमी टीमने विकास आघाडीच्या घोषणेसोबत शक्तिप्रदर्शनाची तयारी केली. पण, सभा सुरू होईपर्यंत नागरिकांसह महिलांनी घरी जाण्यासाठी रीघ लावली. अवघ्या अर्ध्या तासात अर्धेअधिक मैदान रिकामे झाल्याने शक्तिप्रदर्शनावर प्रश्नचिन्ह उभे ठाकले.पालिकेवर महापौर भाजपाचा या संकल्पनेतून ओमी कलानी टीमला भाजपाने जवळ केले. या आघाडीचे पडद्यामागील सूत्रदार राज्यमंत्री रवींद्र चव्हाण असल्याचे उघड झाले. त्यांनी शहर विकासाच्या मुद्द्यावर भाजपा आणि ओमी टीम एकत्र आल्याचे पुन्हा सांगितले. ओमी यांना सत्तेची चाहूल लागत असतानाच त्यांच्या टीमला गळती लागली आहे. राष्ट्रवादीतही नवा प्रवाह उदयाला आला. ओमी यांच्यासोबत राष्ट्रवादीतील १९ पैकी १४ नगरसेवक राहिले. इतरांनी विविध पक्षांत प्रवेश केला. मनाजोगत्या प्रभागातून तिकीट मिळाले नाही, तर ओमी टीममधील निम्मे नगरसेवक पुन्हा राष्ट्रवादीत परततील, असे भरत गंगोत्री सांगत आहेत. आघाडीच्या वाटाघाटी दोन दिवसांत अंतिम टप्प्यात येतील, तोवर गट फुटू नये, म्हणून शेवटच्या दोन दिवसांत सर्व पक्ष आपापल्या याद्या जाहीर करण्याची शक्यता आहे.