शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

कामगाराला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वकीलाला तीन वर्षांची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2021 23:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : मालकाने कामाचा मोबादला उशिराने तोही कमी दिल्यामुळे लल्लन उर्फ अनिल विश्वकर्मा (४०, रा. साईनगर, ...

ठळक मुद्देठाणे न्यायालयाचा निर्णयघोडबंदर रोड येथील सात वर्षांपूर्वीची घटना

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: मालकाने कामाचा मोबादला उशिराने तोही कमी दिल्यामुळे लल्लन उर्फ अनिल विश्वकर्मा (४०, रा. साईनगर, घोडबंदर रोड, ठाणे) याने सात वर्षांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याच गुन्हयामध्ये आरोपी असलेला मालक तथा वकील सिबी जेकब इप्पन याला सोमवारी ठाण्याचे सत्र न्यायाधीश एस. एस. तांबे यांनी तीन वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे.घोडबंदर रोडवरील साईनगर येथे राहणारे लल्लन हे ठाण्यातील रेमंड कंपनीसमोर असलेल्या देवदया पार्क येथे राहणारे सिबी यांच्याकडे २० वर्षांपासून रंगारी म्हणून कामाला होते. सिबी यांनी त्यांचा वेळेवर पूर्ण पगार दिला नाही. यातूनच मानसिक त्रास झाल्याने सिबी यांच्या साईनगर येथील फॅमिली हायस्कूलजवळ १८ मार्च २०१३ रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास त्यांनी तणावातून शेडच्या छताला रबरी वायरने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी लल्लन यांची पत्नी निशा विश्वकर्मा (३५) यांनी कासारवडवली पोलीस ठाण्यात सिबी याच्याविरुद्ध पतीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी सिबी यानेही ६ एप्रिल २०१३ रोजी अटकपूर्व जामीन मिळविला होता. त्यामुळे २४ एप्रिल २०१३ रोजी त्याला कासारवडवली पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याची जामीनावर सुटका झाली होती. या घटनेच्या वेळी चौकशीमध्ये लल्लन याने लिहिलेल्या दोन चिठ्ठयाही पोलिसांनी जप्त केल्या होत्या. सर्व बाजूंची पडताळणी तसेच साक्षीदार तपासल्यानंतर न्या. एस. एस. तांबे यांनी आरोपी सिबी याला १२ जानेवारी २०२१ रोजी तीन वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली एस. एच. मुरकुटे यांनी या प्रकरणाचा तपास केला. तर अ‍ॅड. वर्षा चंदने यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिले.शिक्षा ऐकल्यानंतर आरोपी झाला भावनावशशिक्षेबद्दल आपल्याला काय म्हणायचे आहे, असे न्यायालयाने विचारल्यानंतर आरोपी सिबी म्हणाले, आय एम स्पीचलेस. त्यांनंतर त्यांने भावनाविवश होत अश्रूंना वाट मोकळी करुन दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीSuicideआत्महत्या