शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

नव्या वेळापत्रकानंतरही लेटमार्क; प्रवाशांचे हाल कायम, अंबरनाथहून सुटणारी लोकल रोज २५ मिनिटे उशिरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 14:36 IST

मध्यंतरी प्रवासी संघटनेसोबत झालेल्या बैठकीत रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक रजनीश गोयल यांनी आम्ही लांबपल्ल्याच्या गाड्यांना प्राधान्य देणार असे स्पष्ट केले होते. त्यामुळे लोकल प्रवाशांना वाली कोण नाही, हे स्पष्ट झाले. 

डोंबिवली : मध्य रेल्वेची लोकल सेवा जी रुळावरून घसरली आहे ती पूर्ववत होण्याचे नावच घेत नाही. एकही दिवस असा नाही की लोकल वेळेत धावत होत्या. पूर्वी लोकल पाच ते दहा मिनिटे उशिराने धावत होत्या. त्याची प्रवाशांना नंतर सवयही झाली. मात्र, आज परिस्थिती आहे की, लोकल २० ते २५ मिनिटे कायम उशिराने धावत आहेत. याचा फटका नोकरदारांना बसत आहे. मध्य रेल्वेचे नवीन वेळापत्रक नुकतेच जाहीर झाले. यामुळे प्रवास सुसह्य होईल असे वाटत होते. मात्र, प्रवास असह्य होत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. मध्यंतरी प्रवासी संघटनेसोबत झालेल्या बैठकीत रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक रजनीश गोयल यांनी आम्ही लांबपल्ल्याच्या गाड्यांना प्राधान्य देणार असे स्पष्ट केले होते. त्यामुळे लोकल प्रवाशांना वाली कोण नाही, हे स्पष्ट झाले. 

कार्यवाही करणार की बोळवणच?    अंबरनाथमधील एका प्रवाशाने एकीचे बळ दाखवले आहे. नव्या वेळापत्रकानुसार अंबरनाथहून सकाळी आठ वाजून १० मिनिटांनी सुटणारी लोकल दररोज २५ मिनिटे उशिराने धावते. त्याचा प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. अनुप मेहेत्रे यांनी या त्रासाविरोधात लढण्यासाठी प्रवाशांना हाक दिली. त्याला प्रवाशांनी प्रतिसादही दिला.    त्रस्त प्रवाशांनी एक निवेदन अंबरनाथच्या स्टेशन मास्तरांना दिले. त्यांनी याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा करू, अशी ग्वाही दिली आहे. आता यावर रेल्वे प्रशासन काही कार्यवाही करणार की नेहमीप्रमाणे बोळवण करणार, याकडे अंबरनाथमधील प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

जलद लोकल धिम्या मार्गावर अनेकदा जलद लोकल दादरच्या पुढे धिम्या मार्गावर वळवतात. परिणमी भायखळा ते सीएसटीएम अर्धा तास घेतात. जलद मार्गावरून लांबपल्ल्याच्या गाड्या काढण्यासाठी हे केले जाते. सर्व लोकलच्या बाबतीत हे घडत नाही. मात्र, ज्या धिम्या मार्गावर वळवितात त्यतील प्रवाशांना फटका बसतो. यामुळे धीम्या लोकलही विलंबाने धावतात. आधीच लोकल कर्जत, कसाराहून उशिरा सुटतात. वेळेत सुटल्या तर कल्याणला थांबवतात म्हणून उशीर होतो. यामुळे कल्याण ते सीएसटीएम डबल फास्ट लोकल दोन तास घेतात अशी टीका प्रवाशांनी केली आहे. 

डोंबिवलीकर प्रवाशांची गैरसोयदादरप्रमाणे डोंबिवली हे गर्दीचे ठिकाण आहे. त्या स्थानकात कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या लोकल फलाट एकवर न आणता दोनवर आणतात. यामुळे फलाटावार गर्दी होते. या लोकल एकवर आणण्यास दोन्ही बाजूंना फलाट असल्याने गर्दी विभागेल असे प्रवाशांचे म्हणणे आहे. होम फलाटावर लोकल आली तर सरकता जिन्याचा वापर प्रवाशांना करता योईल. लॉकडाऊनपासून लोकल फलाट एकवर आणणे बंद आहे. वेळोवेळी विनंती करूनही अधिकारी लक्ष देत नाही, अशी टीका प्रवाशांनी केली आहे.

टॅग्स :localलोकलpassengerप्रवासी