शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ठाण्यात लागणार फटाक्यांची दुकाने पालिकेने दिली सशर्त परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 17:59 IST

फटाके स्टॉलवाल्यांवरची टांगती तलवार आता दूर झाली असून महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या फटाके विक्रेत्यांना सशर्त परवानगी दिली आहे. त्यामुळे आता सोमवार पासून शहराच्या मोकळ्या ठिकाणी, मैदानांमध्ये फटाके विक्रीचे स्टॉल लागले जाणार आहेत.

ठळक मुद्देशहरात आजच्या घडीला २५० फटाके विक्रींची दुकानेसोमवार पासून मोकळ्या मैदानात पुन्हा फटकांची लागणार दुकानेकोपरीतील फटाके विक्रीच्या दुकानदारांना तात्पुरता दिलासाफटाक्यांवरुन तापलेले राजकीय वातावरणही झाले शांत

ठाणे - शिवसेना आणि महारष्ट्र नविनर्माण सेना फटाके बंदीच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याच्या तयारी केली असतांना आणि रिपाइंने फटाके बंदीचे समर्थन केले असतांनाच आता पालिकेने एक पाऊल मागे येत फटाके विक्रेत्यांना फटाक्यांची दुकाने लावण्यासाठी सशर्त परवानगी दिली आहे. त्यामुळे येत्या सोमवार पासून ही दुकाने शहराच्या विविध मोकळ्या जागेत आणि व्यावसायिक संकुलांमध्ये लागली जाणार आहेत.दिल्ली न्यायालयाने फटाक्यांवर बंदी घातल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयानेही तसे आदेश दिले आहेत. तर राज्य शासनानेही याबाबतचे परिपत्रक काढले आहे. त्यामुळे फटाका विक्रेत्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते. असे असतानाच महारष्ट्र नविनर्माण सेना आणि शिवसेनेने फटाक्यावाल्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरण्याची भूमिका घेत आंदोलन करण्याचा पावित्रा घेतला होता. त्यावर ठाणे शहर रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाने (आ) ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची भेट घेऊन न्यायालय आणि राज्य शासनाच्या परिपत्रकाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी अशी मागणी केली होती.

  • कोपरीच्या व्यावसायिकांना देखील सुटकोपरीत मागील कित्येक वर्षापासून निवासी भागात ठाण मांडून बसलेल्या फटाके विक्रेत्यांवर यंदा संक्रात ओढावणार होती. परंतु आता पालिकेच्या म्हणन्यानुसार, येथील काही फटाके विक्रेते हे निवासी क्षेत्रात येत नाहीत, काही येत आहेत, त्यामुळे जे निवासी क्षेत्रात येतात, त्यांना परवाने दिले जाणार नाहीत. परंतु जे निवासी क्षेत्रात नाहीत, त्यांना परवाने दिले जातील असे पालिकेच्या परवाना विभागाने स्पष्ट केले.

 रस्त्यावर, फुटपाथवर कोणत्याही स्वरुपाची जिवीत अथवा वित्त हानी होऊ नये म्हणून पालिकेने गेल्या काही वर्षापासून रस्त्यावर आणि फुटपाथवर फटाक्यांचे स्टॉल लावण्यास बंदी केली आहे. फटाक्यांचे स्टॉल लावायचे झाल्यास, ठाणे महापालिकेची मैदाने, मोकळे भुखंड आदी ठिकाणी अशा प्रकारे स्टॉल लावले जात आहेत. त्यानुसार मागील वर्षी तब्बल २५० च्या आसपास स्टॉल शहरात लागले होते. विशेष म्हणजे यासाठी आकारण्यात येणाºया भाड्यातही पालिकेने मागील वर्षी वाढ केली होती. दरम्यान आता न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे अग्निशमन दलाने, ना हरकत परवाना देण्यास मज्जाव केला. त्यामुळे दिवाळीसाठी खरेदी केलेल्या, फटाक्यांची विक्री कशी करायची असा पेच या विक्रेत्यांना सतावू लागला होता. अखेर शुक्रवारी सांयकाळी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी परवाना विभाग आणि अग्निशमन विभागाची बैठक घेऊन फटाके विक्रेत्यांना सशर्त परवानगी दिली. ही परवानगी देत असतांना गर्दीची ठिकाणे, निवासी क्षेत्र, सार्वजनिक ठिकाणे आदी ठिकाणी फटाक्यांचे स्टॉल लावता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर, खुली मैदाने आणि व्यावसायिक गाळ्यांच्या ठिकाणी फटाके विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये न्यायालयाचे कुठेही उल्लघंन होणार नाही, याची काळजी घेतली जावी असेही त्यांनी या बैठकीत स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त