शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीत अखेर धावली ‘ती ’ मोराची गाडी, बच्चे कंपनीची प्रतीक्षा संपली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2018 20:44 IST

डोंबिवली शहरातील बच्चे कंपनीसाठी प्रमुख आकर्षण असलेली पण गेली आठ महिने बंद अवस्थेत असलेली मोराची गाडी अखेर सुरू करण्यात आली आहे.

 डोंबिवली - शहरातील बच्चे कंपनीसाठी प्रमुख आकर्षण असलेली पण गेली आठ महिने बंद अवस्थेत असलेली मोराची गाडी अखेर सुरू करण्यात आली आहे. या बंद मोराच्या गाडीसंदर्भात लोकमतने श्रेयासाठी धावलात , पण मोराची गाडी कधी धावणार? असे वृत्त नुकतेच प्रकाशित केले होते. याची दखल घेत केडीएमसीने ही गाडी सुरू केली आहे. सोमवारी या गाडीतून फेरी मारताना चिमुकल्यांच्या चेह-यावर वेगळाच आनंद ओसंडुन वाहत असल्याचे पहावयास मिळाले. नव्या स्वरूपात असलेली ही मोराची गाडी पावसाळयापुर्वी सुरू करण्यात आली खरी, पण सात ते आठ महिने बंद होती. नव्या गाडीचा शुभारंभ करताना राज्यमंत्री रवींद्र चव्हाण व भाजपाच्या पदाधिका-यांनी उपस्थिती लावली होती. पण त्यानंतर अनेक महिने ही गाडी बंद राहील्याने श्रेयासाठी धावलात पण मोराची गाडी कधी धावणार? असा सवाल उपस्थित झाला होता. मनसेचे डोंबिवली शहर अध्यक्ष यांनी तर बुलेट ट्रेनचे स्वपA नंतर दाखवा पण साधी मोराची गाडी तरी आधी सुरू करा असा टोला भाजपाला लगावला होता. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनेही पत्रव्यवहार करून मोराची गाडी लवकर चालू करा अन्यथा आंदोलन छेडू असे पत्र उद्यान अधिक्षक संजय जाधव यांना दिले होते. दरम्यान महापालिका क्षेत्रतील उद्यानांचा व त्यातील सुविधांचा उडालेला बोजवारा पाहता ही उद्यान खाजगी संस्थानांच्या माध्यमातून विकसित करण्याचा निर्णय केडीएमसीने घेतला आहे. त्याचप्रमाणो छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचा देखील विकास केला जाणार आहे. श्री गणोश मंदिर संस्थानाच्या वतीने या उद्यानाचा कायापालट केला जाणार आहे. ही कंत्रटाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान मोराची गाडी बंद असल्याबाबत होत असलेली टिका पाहता केडीएमसीनेच पुढाकार घेत ही गाडी सुरू केली आहे. सायंकाळी 6 ते 8 वाजेर्पयत ही गाडी चालविली जाणार आहे. सध्या कोणतेही शुल्क आकारले जात नाही. मोराची गाडी ही आमच्या लहानपणापासून आकर्षण ठरली आहे. ही गाडी अविरतपणो सुरू राहीली पाहिजे असे मत पालक प्राजक्ता हेगिष्टे-लोध यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.  तांत्रिक दोष दूर व्हावेत मोराची गाडी सुरू झाली  ही समाधानाची बाब आहे. परंतू या गाडीत अनेक दोष असून ट्रॅकही गंजलेल्या अवस्थेत आहे. लहान मुले या गाडीतून आनंद लुटत आहेत त्यामुळे दोषांची  तातडीने  गांभिर्याने दखल घ्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे डोंबिवली शहर कार्याध्यक्ष राजेंद्र नांदोस्कर आणि उपाध्यक्ष प्रसन्न अचलकर यांनी केली आहे. 

टॅग्स :dombivaliडोंबिवली