शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पारसिकच्या डोंगरावर लेझरने विद्युत रोषणाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 23:48 IST

पारसिकच्या चौपाटीला लागून असलेल्या विस्तीर्ण आणि नयनमनोहर अशा पारसिकच्या डोंगराचे रूप आकर्षक विद्युत रोषणाईने अधिकच मोहरणार आहे.

ठाणे : पारसिकच्या चौपाटीला लागून असलेल्या विस्तीर्ण आणि नयनमनोहर अशा पारसिकच्या डोंगराचे रूप आकर्षक विद्युत रोषणाईने अधिकच मोहरणार आहे. या डोंगरावर लेझर तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मुंब्रादेवी मंदिराच्या बाजूला असलेल्या भव्य कातळावर भारतीय सण, परंपरा यांच्या प्रतिमा प्रतीत करणारी आकर्षक विद्युतरोषणाई, विविध संदेश दाखवण्यात येणार आहे. अशा पद्धतीचा ठाण्यातील हा पहिलाच प्रकल्प आहे. सोमवारी परिसराची पाहणी केल्यानंतर आयुक्त संजीव जयस्वाल यांनी हा निर्णय घेतला.ठाणे शहराला निसर्गाचा ठेवा लाभला आहे. एकीकडे येऊरचे घनदाट जंगल, मध्ये विस्तीर्ण खाडी आणि पलीकडे पारसिकचा कडा. शहराची शान असलेला हा पारसिक कडा भारतीय संस्कृती आणि परंपरेची अनेक प्रतीके विद्युतरोषणाईच्या माध्यमातून आपल्या अंगाखांद्यावर मिरवणार आहे. पारसिक रेतीबंदर येथे आंतरराष्ट्रीय कीर्तीची चौपाटी निर्माण करण्याचे काम सुरू आहे. तिला भेट देण्यासाठी रोज हजारो पर्यटक येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पारसिक चौपाटीवरून पारसिक डोंगराचे मनोहारी रूप सायंकाळच्या आणि रात्रीच्यावेळी पर्यटकांना अनुभवता यावे, यासाठी ही विद्युतरोषणाई करण्यात येणार आहे. लेझर तंत्रज्ञानाच्या साहाय्याने हा प्रकल्प प्रत्यक्षात उतरणार असल्याने त्याचे महत्त्व अधिकच वाढणार आहे. याबाबत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानुसार, महापालिका आयुक्तांनी सोमवारी पाहणी करून अशा प्रकारची विद्युतरोषणाई करण्याचा निर्णय घेतला.