शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

कोविड सेंटरमधील रुग्णाच्या जेवणात अळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 23:56 IST

टाटा आमंत्रा येथील प्रकार : कंत्राटदाराविरोधात कारवाईचा बडगा

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कल्याण-डोंबिवली मनपाच्या भिवंडीतील टाटा आमंत्रा येथील कोविड केअर सेंटरमधील एका रुग्णाच्या जेवणात अळ्या सापडल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली आहे. त्यामुळे तेथील रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

टाटा आमंत्रामध्ये चंद्रेश मुंबरकर हे १९ सप्टेंबरपासून क्वारंटाइन आहेत. त्यांना बुधवारी भाजीत अळ्या सापडल्या. याबाबत त्यांनी व्हिडीओ व्हायरल केला असून, या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे. यापूर्वीही येथील रुग्णांना चांगले जेवण दिले जात नसल्याच्या तक्रारी आल्या होत्या.दरम्यान, केडीएमसीने या प्रकरणाची दखल घेतली असून, कंत्राटदार व दुकानदार यांच्याविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे.

याबाबत केडीएमसीचे सचिव संजय जाधव म्हणाले, ‘टाटा आमंत्रा येथे क्वारंटाइन आणि पॉझिटिव्ह रुग्ण यांना वेगवेगळ्या इमारतींमध्ये ठेवण्यात येते. रुग्णांना दर्जेदार जेवण देण्याचा प्रयत्न आहे. बुधवारी जेवणामध्ये अळी सापडल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर तत्काळ सर्व जेवण बदलण्यात आले. याची चौकशी सुरु असून, कंत्राटदाराला सक्त ताकीद दिली आहे. ज्या दुकानातून सोयाबीन खरेदी केले आहे, त्याचीही चौकशी करत असून, आवश्यकता वाटल्यास अन्न व औषध प्रशासनाला याबाबत कळवले जाईल.’

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस