शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसात रस्त्यांवर मोठे खड्डे; मीरा रोडला खड्ड्याने घेतला पहिला बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 06:17 IST

दुचाकीस्वाराचा खड्ड्याने बळी गेल्यानंतर आता सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे भरण्यास सुरुवात केली.

मीरा रोड : वाहतुकीची मोठी वर्दळ असलेल्या घोडबंदर मार्गावर अवघ्या दोन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी खड्डे पडले असून, शासनाच्या दुर्लक्षामुळे मंगळवारी काजूपाडाजवळ खड्ड्यामुळे दुचाकी खाली पडल्याने मागून आलेल्या एसटी बसखाली सापडून मोहनीश अहमद इरफान खान (वय ३७, रा . पठाणवाडी, मुंब्रा) या दुचाकीस्वारचा मृत्यू झाला. याच मार्गावर अन्य एक दुचाकीस्वार खड्ड्यात पडला; पण सुदैवाने बचावला.

इलेक्ट्रिशियन असलेले मोहनीश अहमद इरफान खान हे मंगळवारी ठाण्याकडून घोडबंदर मार्गाने दुचाकीवरून काशीमीरा भागातील जेपी इन्फ्रा भागात कामासाठी चालले होते. सकाळी ११ च्या सुमारास काजूपाडा येथे रस्त्यावर पडलेल्या एका मोठ्या खड्ड्यात दुचाकी फसल्याने खान हे दुचाकीसह खाली पडले. त्याचवेळी मागून ठाणे-बोरिवली ही एसटी बस वेगाने आली व रस्त्यावर पडलेले खान हे बसच्या मागील चाकाखाली सापडून मरण पावले. काशीमीरा पोलीस ठाण्यात एसटी बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी सांगितले.

खड्डे भरण्यास सुरुवात याच भागात आणखी एक दुचाकीस्वार खड्ड्यामुळे खाली पडला होता. परंतु त्यावेळी सुदैवाने मागून भरधाव वेगात एखादे अवजड वाहन येत नसल्याने तो बचावला. दुचाकीस्वाराचा खड्ड्याने बळी गेल्यानंतर आता सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे भरण्यास सुरुवात केली.

२४ तास अधिकारी नेमण्याची मागणी वाहतूक शाखेचे निरीक्षक रमेश भामे म्हणाले की, पाऊस पडत असला, तरी वाहनांची मोठी वर्दळ पाहता खड्डे बुजवणे आवश्यक आहे. त्यामुळे तातडीने खड्डे बुजवण्यासाठी खड्डे बुजवणारे पथक व अधिकारी २४ तास नेमण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.