शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वकिलाच्या कार्यालयातून लॅपटॉप चोरणा-यास रंगेहाथ पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 02:16 IST

नौपाड्यात एकाच दिवशी वेगवेगळ्या भागांत चोरीच्या दोन घटना घडल्या. यातील चरईतील एका महिला वकिलाच्या कार्यालयातून लॅपटॉप लांबवणा-या अफरोज शेख

ठाणे : नौपाड्यात एकाच दिवशी वेगवेगळ्या भागांत चोरीच्या दोन घटना घडल्या. यातील चरईतील एका महिला वकिलाच्या कार्यालयातून लॅपटॉप लांबवणा-या अफरोज शेख (२६) या चोरट्याला मात्र नागरिकांनी रंगेहाथ पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याला ११ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली असून त्याच्याकडून चोरीतील लॅपटॉपही हस्तगत केला आहे.कळव्याच्या भास्करनगर भागात राहणाºया अफरोज याने ८ आॅक्टोबर रोजी पहाटे ३ वा.च्या सुमारास चरईच्या काबाडआळीतील आनंदवन या इमारतीच्या तळ मजल्यावरील अ‍ॅड. स्वाती प्रधान-चिटणीस यांच्या कार्यालयाच्या दरवाजाचे लॅच तोडून साथीदारासह आत शिरकाव केला. तो या कार्यालयाचे लॅच तोडत असतानाच इमारतीमधील एका रहिवाशाने ठाणे शहर पोलीस नियंत्रण कक्षासह इमारतीमधील इतर रहिवाशांनाही फोनवरून ही माहिती दिली. योगायोगाने या इमारतीच्या जवळूनच नौपाडा पोलिसांच्या गस्तीची मोबाइल व्हॅन जात होती.नियंत्रण कक्षातून बिनतारी संदेश यंत्रणेद्वारे माहिती मिळताच उपनिरीक्षक शिरीष यादव यांचे पथकही अवघ्या चार ते पाच मिनिटांमध्ये पोहोचले. तोपर्यंत तिथे जमा झालेल्या नागरिकांनी अफरोजला लॅपटॉपसह पकडले. मात्र, या धुमश्चक्रीत त्याचा दुसरा साथीदार पसार झाला. पोलिसांनी त्याच्याकडून लॅपटॉप तसेच कटर, वायर कटावणी, रिंग पाना आणि इतर चोरी करण्यासाठीची सामग्री हस्तगत केली. ठाणे न्यायालयाने त्याला सोमवारी दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली.तर, अन्य एका घटनेत सनमीत राजेभोसले यांच्या कॅण्डी किसेस, जीवनतारा, शॉप क्रमांक ६, विष्णुनगर येथील दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून ३ हजार ३२० ची रोकड तसेच लॅपटॉप असा २३ हजार ३२० रुपयांचा ऐवज घेऊन चोरट्यांनी पलायन केल्याची घटना ८ आॅक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी नौपाडा पोलीस उपनिरीक्षक तृप्ती खळदे या तपास करत आहेत.

टॅग्स :ArrestअटकCrimeगुन्हा