शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वेसाठी लागणारे ठाणे परिसरातील २२ हेक्टरचे भूसंपादन पूर्ण!

By सुरेश लोखंडे | Updated: September 29, 2022 20:33 IST

भूसंपादित केलेल्या या २२ हेक्टरपैकी खासगी मालकीचे १८ हेक्टर आठ आर ८१ चौ.मीटर जागे भूसंपादन करण्यात आले आहे.

ठाणे: येथून जाणाऱ्या मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी लागणारी २२ हेक्टर ४८ आर जमिनीचे १०० टक्के भूसंपादन गुरूवारी पूर्ण करण्यात आले आहे. त्यासाठी मौजे आगासन, म्हातार्डी, बेतवडे, डावले, पडले, शिळ व देसाई, आदी ठिकाणचे अतिक्रमणही तत्काळ पाडून या बुलेट ट्रेनसाठी लागणारी जागा उपलब्ध करून दिल्याचे उपविभागीय अधिकारी अविनाश शिंदे यांनी लोकमतला सांगितले.

ठाणे शहर परिसरातून जाणाºया या मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीचा खुला ताबा सक्तीने नॅशनल हायस्पीड रेल कॉपोर्रेशनला ३० सप्टेंबरपर्यंत देण्याचे आदेश जारी झाले होते. त्याची गांभीर्याने दखल घेत आगासन, म्हातार्डी, बेतवडे, डावले, पडले, शिळ व देसाई आदी ठिकाणचे अतिक्रमण, निवासी घरे, गाळे जेसीबीच्या सहाय्याने तोडले आहे. यामध्ये १२ बांधकामे ही चार सर्वेनंबरमधून तोंडली आहेत.            

ठाणे तालुक्यातील या मुंबई -अहमदाबाद हायस्पिड प्रकल्प म्हणजे बुलेट ट्रेनच्या भूसंपादनची शंभर टक्के कार्यवाही पूर्ण होऊन जमिनीचा शंभर टक्के ताबा मुंबई -अहमदाबाद हायसिप्ड प्रकल्पाच्या अधिकाºयांना दिला आहे. यासाठी सरकारी आणि खाजगी जमिनीवरील सर्व बांधकामे तोडून खुल्या जागेचा ताबा बुलेट ट्रेन च्या अधिकाºयाना आज दिल्याचे शिंदे यांनी लोकमतला सांगितले.

या रेल्वे प्रकल्पासाठी जमिनीचे भोगवटादार यांच्याकडून घेऊन या बुलेट ट्रेन प्रशासनाकडे जमीन हस्तांतरीत करण्यासाठी या प्रकल्पाच्या समिती प्रमुखांसह नायब तहसीलदार, उपविभागीय अधिकाारी,ठाणे समिती उपप्रमुख , तहसीलदार, तलाठी, मंडळ अधिकारी आदी यंत्रणा या गांवामध्ये तैनात करून संपूर्ण जागा मोकळी केली आणि बुंलेट ट्रेन प्रशाासनाकडे सुपूर्द केल्याचे शिंदे यांनी सांगितले. या रेल्वे प्र्रकल्पासाठी लागणाºया भूखंडावर वसलेल्या रहिवाश्यांकडून प्रशासनाला कडाडून विरोध झाला. मात्र पोलिस बळासह जिल्हा प्रशासनाच्या अधिकाºयांनी यावर मात करून या जमिनीचे भूसंपादन पूर्ण केले.         भूसंपादित केलेल्या या २२ हेक्टरपैकी खासगी मालकीचे १८ हेक्टर आठ आर ८१ चौ.मीटर जागे भूसंपादन करण्यात आले आहे. याशिवाय ठाणे महापालिका क्षेत्रातील ३९ आर ७७ चौ.मीटर च्या भूखंडासह केंद्र शासनाच्या मालकीची  एक आर ३३ चौ.मीटर जागा संपादीत केली आहे. याप्रमाणेमधील जमीन एक हेक्टर ७७ आर ८७ चौ.मीटर आहे. तर मध्य रेल्वेच्या मालकीची ४२ आर ३९ चौ.मीटर जागा संपादीत केली आहे. यामध्ये राज्य शासनाच्या मालकीची दोन हेक्टर ३२ आर १० चौ.मीटर जागा आहे. याशिवाय खाजगी जमीन वाटाघाटी अन्वये खरेदी केलेली सहा हेक्टर, ४८ आर, २१ चौ.मीटर असल्याचे शिंदे यांनी निदर्शनात आणून दिले.

टॅग्स :thaneठाणे