शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

लखोबास तीन वर्षांची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 01:47 IST

कोलकाता येथील तन्मय गोस्वामी या लखोबाला ठाणे प्रथम वर्ग (दुसरे) न्यायालयाने ३० नोव्हेंबर रोजी दोषी ठरवून तीन वर्षांची शिक्षा सुनावली.

ठाणे: मेट्रोमोनिअल आणि शादी डॉट कॉम यासारख्या लग्न जमवणाऱ्या साईटवर खोटी माहिती अपलोड केल्यानंतर उच्चपदावरील तरूणींना लग्नाचा प्रस्ताव पाठवून त्यांना फसवणा-या कोलकाता येथील तन्मय गोस्वामी या लखोबाला ठाणे प्रथम वर्ग (दुसरे) न्यायालयाने ३० नोव्हेंबर रोजी दोषी ठरवून तीन वर्षांची शिक्षा सुनावली. मुंबई-ठाण्यातील फसवणूक झालेल्या तरूणींना प्रत्येकी दोन लाख रुपये देण्याचे आदेशही त्याला दिले. यात सहायक सरकारी अभिभोक्ता म्हणून रश्मी क्षीरसागर यांनी काम पाहिले.आरोपी तन्मय याने राहुल सिन्हा याने बनावट नावे जीवन साथी डॉट कॉम या साईटवर प्रोफाईल अपलोड करून तो डेप्युटी कमिशनर असल्याचे भासविले. त्यानुसार ठाण्यातील एका तरूणीला लग्नासाठी प्रस्ताव पाठवून तिला आपली आई कोलकाता येथे, तर बहिणी अमेरिकत असून त्याची बदली मुंबईत झाल्याचे सांगितले. त्यानंतर काही दिवसांत ते दोघे भेटलेही. ठाण्यात भेटल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचे ठरवले. दरम्यान,त्याने तिला शासकीय योजनेंतर्गत म्हाडामध्ये घर बुकिंगसाठी एक लाखांची गरज असल्याचे सांगून, ते पैसे चेकद्वारे तन्मय गोस्वामी या नावाने देण्यास सांगितले. तिने दिलेला चेक वटल्यानंतर त्याने गाडी घेण्यासाठी वेळोवेळी पैसे मागून तिच्याकडून ६८ हजार रुपये घेतले. याचदरम्यान मुंबईत १८ लाखांची फसवणूक झालेल्या एका तरुणीचा ठाण्यातील या तरुणीला फोन आला. तेव्हा त्याचे बिंग फुटले. तिने मुंबई, बांगूरनगर येथे गुन्हा दाखल केल्याची माहिती दिल्यावर ठाण्यातील तरुणीनेही तिची फसवणूक झाल्याची तक्रार वर्तकनगर पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, त्याला ७ जून २०१५ रोजी मद्रास पोलिसांनी मुंबईतून अटक केली होती. त्यानंतर, तो विवाहीत असून त्याला दहा वर्षांचा मुलगा असल्याची बाब तपासात पुढे आली. या प्रकरणी ठाणे जिल्हा प्रथम वर्ग (दुसरे) न्यायालयाच्या न्यायाधीश आर. एच. झा यांच्यासमोर झाली. सहायक सरकारी वकील क्षीरसागर यांनी सादर केलेले पुरावे आणि फिर्यादीसह चार साक्षीदारांची साक्ष ग्राह्यमानून त्याला दोषी ठरवले. त्यानुसार, त्याला फसवणूकप्रकरणी तीन वर्ष, पैसे घेण्याच्या गुन्ह्याखाली दोन आणि आयटी अ‍ॅक्टनुसार एक वर्ष अशी शिक्षा सुनावली. त्याचबरोबर त्याला तक्रारदार आणि मुंबईतील साक्षीदार या दोघींना प्रत्येकी दोन लाख देण्याचे आदेश दिले आहेत.>ही नावे केलीहोती त्याने धारणतन्मयने राहुल सिन्हा, हेंमत गुप्ता, संजीव चॅटर्जी, राजेश गुप्ता या नावाने बनावट प्रोफाईल तयार केले होते. जीवन साथी डॉट कॉम, भारत मेट्रोमोनिअल, शादी डॉट कॉम या साईटवर प्रोफाईल अपलोड करून, बंगळुरुमधील तीन, पुण्यातील एक आणि ठाणे-मुंबईतील दोघांची अशा सहा जणांची त्याने फसवणूक केल्याची नोंद आहे.>आरोपी बंगळुरु कारागृहाततन्मय हा सध्या बंगळुरुतील कारागृहात असून या खटल्याप्रकरणी ठाण्यात आणून त्यांचा जबाब नोंदवला. हैद्राबाद (गुन्हे) पोलीस निरीक्षक प्रसाद यांचीही साक्ष झाली.तक्रारदार जर्मनीतून आल्याया गुन्ह्यातील तक्रारदार नोकरीनिमित्त जर्मनीत वास्तव्यास आहे.त्यांनी याप्रकरणी जर्मनीतून येऊन तन्मयविरोधात साक्ष दिली. त्यानंतर आरोपीला शिक्षा सुनावण्यात आली.