शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
2
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
3
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
4
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
5
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
6
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
7
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
8
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
9
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
10
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
11
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
12
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
13
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
14
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
15
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
16
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
17
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
18
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
19
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
20
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल

उपवन तलाव कात टाकणार

By admin | Updated: February 2, 2016 01:53 IST

लोकमतने आपल्या काहीतरी तर ठाणेकर या मोहिमेंतर्गत ठाणे शहरातील तलावांच्या दुरवस्थेवर प्रकाशझोत टाकल्यानंतर महापालिकेत त्यांचा कायापालट करण्याचा मानस व्यक्त केला होता.

ठाणे : लोकमतने आपल्या काहीतरी तर ठाणेकर या मोहिमेंतर्गत ठाणे शहरातील तलावांच्या दुरवस्थेवर प्रकाशझोत टाकल्यानंतर महापालिकेत त्यांचा कायापालट करण्याचा मानस व्यक्त केला होता. त्यानुसार, काही तलावांच्या सुशोभीकरणाचे कामही सुरू झाले आहे. तर, आता ठाण्याची दुसरी चौपाटी म्हणून ओळख असलेला उपवन तलावही येत्या काही दिवसांत कात टाकणार आहे. लोकमतचा पाठपुरावा आणि आ. प्रताप सरनाईक यांनी केलेल्या मागणीनंतर उपवन तलावाच्या नैसर्गिक सौंदर्याला कोणत्याही प्रकारे बाधा न आणता वाराणसीतील सुप्रसिद्ध बनारस घाटाच्या धर्तीवर विसर्जन घाट व अ‍ॅम्पी थिएटर उभारण्याचा निर्णय महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला आहे. त्यानुसार, वास्तुविशारद अरु णकुमार यांनी संकल्पचित्र महापालिकेच्या शहर विकास विभागाकडे सुपूर्द केल्यानंतर बांधकाम खात्याने १ कोटी ९६ लाखांचे अंदाजपत्रक तयार केले. उपवन तलाव येथे व अ‍ॅम्पी थिएटर उभारल्यास फक्त संस्कृती आर्ट फेस्टिव्हलच नव्हे तर वर्षाच्या ३६५ दिवस येथे विविध सांस्कृतिक कलाविष्कार होऊ शकतील, तसेच स्थानिक कलाकारांनाही आपली कला सादर करण्याकरिता हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होऊ शकेल. त्याचबरोबर उपवन तलावाशेजारी नागरिकांना बसण्यासाठी फक्त दगडी बांधकामाच्या साहाय्याने १२०० ते १५०० आसनांची व्यवस्था येथे केल्यास नागरिकांनाही विरंगुळ्याचे ठिकाण उपलब्ध होऊ शकेल, असे सरनाईक यांनी निदर्शनास आणले होते. त्यानुसार, आयुक्तांनी तसे निर्देश दिल्यानंतर नगर अभियंता रतन अवसरमोल व कार्यकारी अभियंता नितीन पवार यांनी कामास सुरु वात केली आहे. निसर्गरम्य परिसर लाभलेला उपवन तलाव लवकरच कात टाकणार आहे.