शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

लेडिज केडिया, थाली घागरा आणि क्रॉप टॉपची क्रेझ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 23:55 IST

स्पर्धकांची पसंती पारंपरिक घागऱ्यांना; विविध डिझाइन्सचे जॅकेट्स उपलब्ध

- प्रज्ञा म्हात्रेठाणे : गरब्यासाठी यंदा इंडो वेस्टर्न पोशाखाला गरबाप्रेमींनी पसंती दिली आहे. पद्मावत चित्रपटातील घागºयाला मागे सारत यावर्षीच्या नवरात्रोत्सवात महिलावर्गाचा कल लेडिज केडिया, थाली घागरा आणि क्रॉप टॉपकडे आहे. मात्र, स्पर्धेत भाग घेणारे स्पर्धक पारंपरिक चनिया चोली, घागरा खरेदी करताना दिसून येत आहेत. या उत्सवात गडद रंग आणि भरगच्च नक्षीदार काम असलेल्या पेहरावालाच महिलांची अधिक पसंती आहे.नवरात्रोत्सव दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यानिमित्ताने नवरात्रोत्सवात खास घालण्यात येणारा पेहराव आणि त्यावर मॅचिंग ज्वेलरीची तुफान खरेदी सुरू आहे. पावसाची धाकधूक मनात असली, तरी खरेदीला मात्र ब्रेक लागलेला नाही. गरब्यात चारचौघांत उठून दिसावे, यासाठी आकर्षक वेशभूषा करण्याकडे खासकरून महिलावर्गाचा कल असतो. त्यामुळे नवीन स्टाइल आली की, त्याप्रमाणे खरेदी केली जाते. यंदा लेडिज केडियाची तुफान क्रेझ आहे. केडिया म्हटले की, ते पुरुषवर्गच परिधान करीत असे. परंतु, या पेहरावावर आता महिलांचेही वर्चस्व आहे. त्यामुळे हा पोशाख बनविणाऱ्यांनी महिलांसाठी केडिया बनवला आहे. क्रॉप टॉपवर धोती किंवा घागरा हा एक आकर्षक पेहराव आहे. क्रॉप टॉपमध्ये साधा क्रॉप टॉप, केडिया क्रॉप टॉप, कच्छी वर्क असलेला क्रॉप टॉप, फ्रील क्रॉप टॉप असे विविध प्रकार आहेत. थाली चनिया चोलीदेखील तरुणींना आकर्षित करीत आहे. डबल, ट्रीपल लेयर्सची चनिया चोली उठून दिसत आहे. कच्छी बॉर्डर असलेला १० मीटरचा घागराही आहे. नवरात्रोत्सवात घेण्यात येणाºया रासगरबा स्पर्धेतील स्पर्धक या घागºयाला पसंती देत आहेत. एक वर्षाच्या चिमुकलीपासून अगदी ३० ते ३५ वर्षांच्या महिलावर्गापर्यंत सर्व महिलांसाठी हे विविध रंगांचे आणि विविध प्रकारांचे पेहराव उपलब्ध आहेत, असे कल्पना गाला यांनी सांगितले.फिशकटचा जॅकेट गरबा रसिकांना भुरळ घालत आहे. नवीन ट्रेण्ड ज्या पेहरावाचा आहे, तो पेहराव जास्त खरेदी केला जातो. ज्यांना परवडत नाही ते गरबा रसिक भाडेतत्त्वावर पेहराव घेऊन जातात.- कल्पना गाला

टॅग्स :Navratriनवरात्री