शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

‘मरे’वर १३२ फेऱ्यांची कमतरता

By admin | Updated: August 30, 2015 23:24 IST

वाढती प्रवासीसंख्या आणि रोजचीच लटकंती यामुळे मुंबईकरांचा लोकल प्रवास दिवसेंदिवस जिकिरीचा होत चालला आहे. मध्य रेल्वेची स्थिती अधिक बिकट असून, ही समस्या दूर

सुशांत मोरे, मुंबईवाढती प्रवासीसंख्या आणि रोजचीच लटकंती यामुळे मुंबईकरांचा लोकल प्रवास दिवसेंदिवस जिकिरीचा होत चालला आहे. मध्य रेल्वेची स्थिती अधिक बिकट असून, ही समस्या दूर करण्यासाठी लोकल आणि फेऱ्यांमध्ये वाढ करणे अपरिहार्य आहे. सध्या मध्य रेल्वेची मेन लाइन आणि ट्रान्स हार्बरवर १३२ फेऱ्यांची कमतरता आहे, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. मध्य रेल्वेचा पसारा हा सीएसटीपासून कर्जत, कसारा, खोपोलीपर्यंत आहे. हार्बरचा पनवेल आणि अंधेरी तर ट्रान्स हार्बरचा ठाणे ते पनवेलपर्यंत आहे. या सर्व मार्गांवरून सध्या १४२ लोकलमधून ४१ लाख प्रवासी प्रवास करतात. गेल्या काही वर्षांतील प्रवासीसंख्येशी तुलना केली असता यात बरीच वाढ झाली आहे. २000-२00१ दरम्यान २७ लाख २0 हजार प्रवासी मध्य रेल्वेवरून प्रवास करीत होते. गेल्या १५ वर्षांत यात जवळपास १३ लाख ८0 हजार प्रवाशांची भर पडली आहे. या वाढत्या गर्दीचा प्रवास सुकर करण्यासाठी अधिक लोकलची गरज आहे. मेन लाइनवर ठाणे ते कर्जत, खोपोलीदरम्यान आणि ट्रान्स हार्बरवर ठाणे ते पनवेल, वाशीदरम्यान प्रवासीसंख्येत बरीच वाढ झाली आहे. हे पाहता एकूण आठ लोकलची कमतरता मध्य रेल्वेला भासत असल्याचे रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले. यात मेन लाइनवर चार आणि ट्रान्स हार्बरवर चार लोकल कमी पडत असून, एकूण १३२ फेऱ्यांची कमतरता आहे. या फेऱ्या वाढल्यास मेन लाइनवर ठाण्यापुढील डाऊन दिशेला आणि ट्रान्स हार्बरवर बराच ताण पडत आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर सर्व बम्बार्डियर लोकल येणार असून, मध्य रेल्वेला सिमेन्स लोकल मिळतील आणि यातील काही लोकल आल्यावर बराचसा ताण कमी होऊ शकतो, अशी आशा अधिकाऱ्याकडून व्यक्त करण्यात आली.