शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

श्रमजीवी संघटनेचा सफाई व उद्यान विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगारासाठी पुन्हा आंदोलन  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2020 20:01 IST

काही पदाधिकारी आणि अधिकारी पगार होऊ देत नसल्याचा आरोप करत श्रमजीवी संघटनेने आज बुधवारी पुन्हा आंदोलन केले. 

मीरारोड - मीरा-भाईंदर महापालिकेतील कंत्राटी सफाई व उद्यान विभागातील कामगारांचा पगार देण्यासाठी आयुक्तांनी धनादेश तयार करून ठेवलेला असतानादेखील काही पदाधिकारी आणि अधिकारी पगार होऊ देत नसल्याचा आरोप करत श्रमजीवी संघटनेने आज बुधवारी पुन्हा आंदोलन केले. 

महापालिकेतील दैनंदिन साफसफाईसाठी ठेकेदार नेमलेला असून सदर ठेकेदाराच्या माध्यमातून शार सफाईचे काम कंत्राटी सफाई कामगार करत आहेत. तर पालिकेच्या उद्यान विभागात देखील ठेक्याने मजूर काम करत आहेत. सदर कामगारांना सप्टेंबर संपायला आला तरी ऑगस्ट महिन्याचा पगार मिळालेला नाही. त्यामुळे कामगारांनी पालिकेच्या नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानाबाहेर शुक्रवारी सायंकाळी धरणे आंदोलन केले होते.

श्रमजीवीचे संस्थापक विवेक पंडित यांच्याशी पालिका आयुक्त डॉ. विजय राठोड आणि उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांनी चर्चा केली. महापालिकेकडे असणारा निधी अपुरा असून, राज्य सरकारकडून अनुदान येत नाही. त्यामुळे कामगारांचा पगार द्यायला उशीर होतो. बुधवारपर्यंत कामगारांचे पगार होतील. यापुढे आधी पगार सफाई कामगारांचा होईल त्यानंतर इतर विभागाचे पगार करू, असे आश्वासन पालिकेच्या वतीने देण्यात आले होते. 

आयुक्तांच्या आदेशानुसार ठेकेदाराचा धनादेश तयार करून ठेवला होता. परंतु पालिकेतील काही पदाधिकारी हे अधिकाऱ्यांना हा पगार करू देत नव्हते. याची माहिती पंडित यांनी आयुक्तांना कळविल्यावर आयुक्तांनी तात्काळ कारवाई करीत उद्याच पगार करण्याचा आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिला.  परंतु आज बुधवारी पगार झाला नाही म्हणून दुपारी ३ वाजता आपले काम पूर्ण केल्यावर कंत्राटी कामगारांनी नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान येथे एकत्र जमून पगार रोखणाऱ्या त्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणा देऊन त्यांचा निषेध केला. 

पगार रखडल्याने कामगार व त्यांच्या कुटुंबीयांची आर्थिक अडचण होत असून घर खर्च चालवणे अवघड झाले आहे. अनेकांना घरभाडे भरणे शक्य होत नाही. प्रवासासाठी पैसे नाहीत अशी परिस्थिती कामगारांची झाल्याने पालिकेने कामगारांची काळजी घेतली पाहिजे, असे श्रमजीवीचे कार्याध्यक्ष सुलतान पटेल म्हणाले. ठाणे जिल्हाध्यक्ष दिलीप गोतारणे यांच्या सहकार्याने प्रभारी अध्यक्ष मंगेश मोरे, चेतन पाटील, रत्नाकर पाटील, हनुमंता जाधव, दिगंबर मेहर, संदीप पाटील, दीपक पाटील, इरफान शेख रमेश गोरेकर आणि इतर संघटक यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले, असे प्रवक्ते मंगेश मोरे यांनी सांगितले.