शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

कामगार कार्यालय, महसुल विभागाच्या दिरंगाईने यंत्रमाग कामगार आपल्या हक्कापासून वंचीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 14:50 IST

भिवंडी : पाच वर्षापेक्षा जास्त काळ ठाणे कामगार न्यायालयांत आपल्या हक्कासाठी लढलेल्या कामगारांना न्यायालयाने निर्णय दिल्यानंतरही स्थानिक कामगार कार्यालय व महसुल विभागाकडून यंत्रमाग कामगारांना आर्थिक भरपाई मिळत नसल्याने हे कामगार वर्षानुवर्षे ापल्या हक्कापासून वंचीत राहिले आहेत.शहरात आणि परिसरांत सुमारे ४० हजारापेक्षा जास्त यंत्रमाग आस्थापना असुन त्यामध्ये सुमारे आठ लाख यंत्रमागांचा ...

ठळक मुद्देयंत्रमाग कामगारांच्या हक्कासाठी संयुक्तीक कारवाई अपेक्षीतपरप्रांतातून आलेल्या कामगारांना ठेवले जाते वंचीतकामगार न्यायालयाने न्याय देऊनही अंंमलबजावणी नाही

भिवंडी: पाच वर्षापेक्षा जास्त काळ ठाणे कामगार न्यायालयांत आपल्या हक्कासाठी लढलेल्या कामगारांना न्यायालयाने निर्णय दिल्यानंतरही स्थानिक कामगार कार्यालय व महसुल विभागाकडून यंत्रमाग कामगारांना आर्थिक भरपाई मिळत नसल्याने हे कामगार वर्षानुवर्षे ापल्या हक्कापासून वंचीत राहिले आहेत.शहरात आणि परिसरांत सुमारे ४० हजारापेक्षा जास्त यंत्रमाग आस्थापना असुन त्यामध्ये सुमारे आठ लाख यंत्रमागांचा समावेश आहे. हे यंत्रमाग चालविण्यासह इतर कामाकरीत सुमारे ५ लाखापेक्षा जास्त यंत्रमाग कामगार काम करीत आहेत. गेल्या पन्नास वर्षापासून शासनाने यंत्रमाग मालकांना नोटीसा बजावून देखील यंत्रमाग मालकांनी कामगारांना हजेरीकार्ड दिलेले नाहीत. कामगारांकडे हजेरीकार्ड नसल्याने त्यांना शासन नियमांप्रमाणे कामगारांचे हक्क मिळत नाही. किमान वेतनासह इतर सोयी सवलती मिळत नाही.त्यामुळे यंत्रमाग कामगार आपल्या हक्कापासून वंचीत राहिला आहे. एकाच यंत्रमाग कारखान्यात १५ वर्षापेक्षा जास्त काम करणाऱ्या कामगारांना त्यांना कोणतेही हक्क अथवा इतर लाभ मिळत नसल्याने त्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. त्यामुळे यंत्रमाग कामगार आपल्या हक्कासाठी कामगार न्यायालयाकडे धाव घेत आहेत. कामगार न्यायालयांत ५ ते ६ वर्षे केस लढल्या नंतर न्यायालयाकडून निर्णय होऊन कामगारांना आर्थिक भरपाई करण्याचे आदेश होतात. या आदेशाची अंमल बजावणी करण्याची जबाबदारी संबधित कामगार न्यायालय शहरातील कामगार अधिकाºयांवर सोपवितात. परंतू हे अधिकारी थेट यंत्रमाग मालकाशी संपर्क न साधता या आदेशाची अंमलबजावणी करण्याकरीता ते आदेश जिल्हाधिकारीकडे पाठवितात. जिल्हाधिकारी ते आदेश स्थानिक महसुल विभागाकडे पाठवितात. अशा प्रकारचे शेकडो कामगारांची लाखो रूपयांची देणी वसुल करण्याचे आदेश तहसिल कार्यालयाकडे धूळ खात पडून आहेत. एक वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटूनही यंत्रमाग मालकांकडून लाखो रूपयांची वसुली महसुल विभागाने केली नाही. शहरात असलेला यंत्रमाग कामगार देशांतील विविध भागातून आलेला आहे. त्याचा गैरफायदा घेत यंत्रमाग मालक कामगारांवर अन्याय करतात. तर न्यायालयांतून न्याय मिळवून देखील शासनाचे आधिकारी कामगारांना त्यांच्या हक्काची रक्कम मिळण्यापासून वंचीत ठेवत असल्याचा आरोप कामगार संघटनेच्या पदाधिकाºयांकडून केला जात आहे. कामगार न्यायालयाच्या निर्णयानंतर आर्थिक भरपाईच्या वसुलीची जबाबदारी महसुल विभागाकडे सोपविल्यानंतर स्थानिक कामगार अधिकारी त्याचा पाठपुरावा करीत नाही. त्यामुळे महसुल आधिकारी व कामगार अधिकारी यांनी संयुक्तीक कारवाई करून कामगारांना आर्थिक भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी यंत्रमाग कामगार संघटनांनी केली आहे.

टॅग्स :Bhiwandiभिवंडीbusinessव्यवसाय