शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

कामगार न्यायालयाचे एसटी कामगारांना हजर राहण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2021 22:13 IST

ठाणे विभागीय कार्यालयाने १४० जणांना बजावल्या नोटिसा, शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांनाही २८ टक्के महागाई भत्त्याचा दर लागु करावा, वार्षिक वेतनवाढ २ वरु न ३ टक्के मान्य केलेल्या तारखे पासून लागू करावेत

ठाणे : मागील काही दिवसांपासून विविध मागण्यांसाठी ठाणे विभागीय कार्यालया अंतर्गत येणाऱ्या आठ आगारातील कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. या संपाची तीव्रता अधिक वाढत आहे . असे असतांना कामगार न्यायालयाने सर्व कामगारांना कामावर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. तर, दुसरीकडे ठाणे विभागीय कार्यालयाकडून देखील १४० कर्मचाऱ्याना कामावर हजर राहण्यासंदर्भातील नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती ठाणे एसटी विभागीय कार्यालयाकडून देण्यात आली. 

शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांनाही २८ टक्के महागाई भत्त्याचा दर लागु करावा, वार्षिक वेतनवाढ २ वरु न ३ टक्के मान्य केलेल्या तारखे पासून लागू करावेत तसेच सातव्या वेतन आयोगानुसार केंद्र व राज्य शासनाने लागु केलेला घरभाडे भत्ता सुधारीत दराने लागु करावा या कृती समितीच्या मागण्या दिवाळी पुर्वीच प्रशासनाने बेमुदत उपोषण केल्या मुळे मान्य केलेल्या आहेत.परंतु कर्मचारी हे विलिणीकरण च्या मुद्यावर ठाम असुन  गेले काही दिवसापासुन कडकडीत संपावर आहेत. ठाणे जिल्ह्यातील आठ आगारातील सुमारे दोन हजार 700 कर्मचारी या संपत सहभागी झाले आहे. कर्मचाऱ्यांच्या सलग सहा दिवसापासून सुरू असलेल्या या संपामुळे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. त्यात आता, कामगार न्यायालयाने देखील सर्व कामगारांना कामावर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. तर, दुसरीकडे ठाणे विभागीय कार्यालयाकडून देखील १४० कर्मचाऱ्याना कामावर हजर राहण्यासंदर्भातील नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती ठाणे एसटी विभागीय कार्यालयाकडून देण्यात आली.

टॅग्स :ST Strikeएसटी संप