शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कुलकर्णीची भाजपातून हकालपट्टी नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 00:33 IST

डोंबिवलीतील भाजपाचे सर्वेसर्वा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे यासंदर्भात विचारणा करण्यासाठी संपर्क साधला असता त्यांनी त्याला कोणताही प्रतिसाद दिला नाही.

डोंबिवली : डोंबिवलीतील भाजपा शहर उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णी याच्या दुकानात शस्त्रास्त्रे मिळाल्याने त्याला गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली. या घटनेला ४८ तास उलटून गेले, तरी भाजपाने त्याची पक्षातून हकालपट्टी केलेली नाही. उलट, भाजपाने चक्क सोयीस्कर मौन धारण केले आहे.

डोंबिवलीतील भाजपाचे सर्वेसर्वा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे यासंदर्भात विचारणा करण्यासाठी संपर्क साधला असता त्यांनी त्याला कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यांच्या खासगी सचिवाकडेही विचारणा केली असता, राज्यमंत्री एका महत्त्वाच्या बैठकीत व्यस्त असल्याचे सांगितले गेले. बैठक संपल्यावर ते बोलतील, असे सांगून वेळ मारून नेण्यात आली. भाजपा डोंबिवली शहराध्यक्षांनीही यावर भाष्य करणे टाळले.

भाजपाचे प्रदेश चिटणीस कल्याणचे आ. नरेंद्र पवार यांनी सांगितले की, पोलिसांची चौकशी सुरू आहे. चौकशीअंती काय उघड होते, ते पाहून त्यानंतर कुलकर्णीविरोधात पक्षाकडून कारवाई करण्याचा निर्णय घेतला जाईल.

मनसेची सीबीआय चौकशीची मागणीमनसेचे गटनेते मंदार हळबे यांंनी मात्र रा.स्व. संघाची चक्क पाठराखण केली. ते म्हणाले की, कुलकर्णी याच्या प्रकरणात भाजपातील काही मंडळींकडूनच गलिच्छ राजकारण केले जात आहे. कुलकर्णी प्रकरणात पोलिसांवर राजकीय व्यक्तींचा दबाव असल्याने या प्रकरणात निष्पक्ष चौकशी होण्याची शक्यता धूसर आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात सीबीआय चौकशी करावी.

‘भाजपाने कुलकर्णी याची हकालपट्टी करावी’मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम म्हणाले की, मनसेच्या कार्यकर्त्याकडून असे कृत्य झाले असते, तर त्याची पक्षाने लागलीच हकालपट्टी केली असती. मात्र, भाजपाने अद्याप कुलकर्णीची हकालपट्टी केली नाही़

टॅग्स :BJPभाजपा