शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
4
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
5
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
6
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
7
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
8
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
9
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
10
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
11
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
12
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
13
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
14
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
15
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
16
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
17
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
18
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
19
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
20
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?

जयंत सावरकर यांना कृतार्थ जीवन सन्मान पुरस्कार तर दिघे दाम्पत्यांना सेवा रत्न दांपत्य पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 16:56 IST

आज संपन्न झालेल्या ज्येष्ठ महोत्सवात मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ रत्न आणि सेवा रत्न पुरस्कारांचे वितरण, नामवंत डॉक्टर्स व वैद्यांचे मार्गदर्शन, ज्येष्ठांसाठी आरोग्य व अध्यात्म या विषयावर सुसंवाद, मान्यवरांची व्याख्याने, मनोरंजनाचा कार्यक्र म, पुस्तक भेट, आदींची रेलचेल ज्येष्ठांनी अनुभवली.

ठळक मुद्देजयंत सावरकर यांना कृतार्थ जीवन सन्मान पुरस्कारदिघे दाम्पत्यांना सेवा रत्न दांपत्य पुरस्कारव्यास क्रिएशन्सतर्फे गडकरी रंगायतन येथे सतरावा ज्येष्ठ महोत्सव साजरा

ठाणे: व्यास क्रिएशन्सच्या वतीने दरवर्षी देण्यात येतो. यंदा ज्येष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर यांना कृतार्थ जीवन सन्मान पुरस्काराने तर सुरेंद्र दिघे व सुमिता दिघे या दाम्पत्यांना सेवा रत्न दांपत्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.व्यास क्रि एशन्सतर्फे मंगळवारी गडकरी रंगायतने येथे सतरावा ज्येष्ठ महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी खास ज्येष्ठांसाठी ‘ज्येष्ठविश्व’ मासिकाच्या पहिल्या अंकाचे व महिला दिनानिमित्त ‘तेजिस्वनी’ विशेषांकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कार्यक्र माला प्रमुख अतिथी म्हणून मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख, नाट्य सिने अभिनत्री प्रतिक्षा लोणकर, अभिनेत्री वर्षा धांदळे आणि ज्येष्ठ रंगकर्मी रागिणी सामंत, तेजिस्वनी अंकाच्या अतिथी संपादिका, आकाशवाणी अस्मिता वाहिनीच्या कार्यक्र म प्रमुख उमा दीक्षित, ज्येष्ठ पत्रकार श्री. वा. नेर्लेकर, वैद्य सुचित्रा कुलकर्णी, ज्येष्ठ समीक्षक श्रीराम बोरकर, ज्येष्ठ नाटककार शशिकांत कोनकर, फेसकॉमचे अध्यक्ष द. तु. चौधरी, मधुकरराव कुलकर्णी, उद्योजिका तनुजा चौधरी, व्यास क्रिएशन्सचे संचालक निलेश गायकवाड उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन नरेंद्र बेडेकर यांनी केले. सुधा चाफेकर. सदाशिव कुलकर्णी, प्रतिभा कुलकर्णी, अरविंद सोनावणे, सुधा शिधये, प्रकाश दिघे, डॉ. श्रीकांत होटे व भास्कर भांड यांना सेवा रत्न तर साधना रसाळ, यशवंत पाटील, जयश्री आंबीकर, जयंत भावे, मुरलीधर परुळेकर, अंतोन पेदू, प्रदीप केळकर, चंद्रकांत पाटील, प्रमोद भोपी यांना ज्येष्ठ रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. ज्या कार्यक्रमाची सुरूवात शास्त्रीय संगीताने होते तो कार्यक्रम नक्कीच यशस्वी होतो. संगीतात सगळीच व्हिटॅमिन्स आहेत. चांगले संगीत ऐका असे आण्ही गर्भवती स्त्रीयांना सांगतो आणि त्याचा नक्कीच परिणाम होतो. जेव्हा दोन पायांनी चालतो तेव्हा तो प्रवास असतो आणि दोन पायांचा प्रवास हृदय ओतून करतो तेव्हा ती यात्रा असते अशा शब्दांत डॉ. देशमुख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

 

 

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई