शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

लोखंडी गर्डर टाकण्याच्या कामासाठी ठाण्यातील कोपरी पूल दोन दिवस बंद राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 00:32 IST

ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी १८ नोव्हेंबर २०२० रोजी कोपरी पूलाच्या कामाची रेल्वे, एमएमआरडीए आणि वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली होती. याच पाहणी दौºयामध्ये त्यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना कोपरी पुलाच्या गर्डरचे काम डिसेंबर २०२० अखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना केल्या होत्या. परंतू तांत्रिक अडचणीमुळे रेल्वेने १६ आणि १७ तसेच २३ आणि २४ जानेवारी या दोन दिवसांच्या रात्री गर्डर टाकण्याचे काम सुरू करण्याचे आदेश रेल्वेला मिळाले.

ठळक मुद्देरात्रीच्या वेळी काम सुरु राहणारपर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या कोपरी पूलावर लोखंडी गर्डर टाकण्याचे काम शनिवारी आणि रविवारी रात्री सुरु राहणार आहे. याच कामासाठी १६ आणि १७ जानेवारी रोजी रात्रीच्या वेळी हा मार्ग वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी १८ नोव्हेंबर २०२० रोजी कोपरी पूलाच्या कामाची रेल्वे, एमएमआरडीए आणि वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली होती. याच पाहणी दौºयामध्ये त्यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना कोपरी पुलाच्या गर्डरचे काम डिसेंबर २०२० अखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना केल्या होत्या. परंतू तांत्रिक अडचणीमुळे रेल्वेने १६ आणि १७ तसेच २३ आणि २४ जानेवारी या दोन दिवसांच्या रात्री गर्डर टाकण्याचे काम सुरू करण्याचे आदेश रेल्वेला मिळाले. या कामासाठी वाहतूक शाखेकडून परवानगी मिळाली नसल्याचा दावा रेल्वेच्या अधिकाºयांनी खासदार विचारे यांना केला होता. याच पार्श्वभूमीवर विचारे यांनी ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांच्याशी चर्चा करून या कोपरी पुलाच्या गर्डर टाकण्याच्या कामाची परवानगीची त्यांच्याकडे मागणी केली. त्यांनीही ती तात्काळ दिली. त्यामुळे येत्या १६ जानेवारी रोजी रात्री ११ आणि १७ जानेवारी रोजी सकाळी ६ तसेच १७ जानेवारी रोजी रात्री ११ ते १८ जानेवारी रोजी सकाळी ६ या दोन दिवशी आनंदनगर येथील भुयारी मार्गावरील ३५ मीटरच्या सात गर्डरचे काम एमएमआरडीए मार्फत सुरु राहणार आहे. त्यानंतर २४ आणि २५ जानेवारी रोजीही रात्री रेल्वे मार्फतीने ६५ मीटरच्या सात गर्डर टाकण्याचे काम सुरु राहणार आहे. त्यामुळे वाहतूक शाखेकडून काही बदल करण्यात येणार आहे. यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन खासदार विचारे यांच्यासह ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने केले आहे.त्याऐवजी अन्य पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहनही ठाणे वाहतूक पोलिसांनी केले आहे.यादरम्यान, मुंबई पूर्वद्रूतगती महामार्गाने ठाणे शहराकडे येणारी मोठी वाहने ही ऐरोली ब्रिज, नवी मुंबई मार्गे इच्छित स्थळी जातील, तर हलकी वाहने नवघर रोड मार्गे कॅम्पास हॉटेल मार्गे मॉडेला चेकनाका येथून तीन हात नाका येथे जातील, असेही वाहतूक शाखेने म्हटले आहे.* या ब्रिजवर गर्डर टाकण्यासाठी वाहतूकीचे नियोजन आणि नियमनासाठी १२ जानेवारी रोजी वाहतूक शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांच्या दालनात बैठक आयोजित केली होती. या बैठकीला मुंबई रेल्वे सुरक्षा दल, एमएसआरडीसी, राज्य महामार्ग वाहतूक विभाग तसेच ठाणे शहर, मुंबई , मीरा भार्इंदर आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील अधिकारी उपस्थित होते. याच बैठकीमध्ये १६ ते १७ जानेवारी २०२१ रोजी रात्रीच्या वेळी पूल वाहतूकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेtraffic policeवाहतूक पोलीस