शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोपरी रेल्वेपूल फेब्रुवारी अखेर वाहतुकीसाठी खुला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2020 23:38 IST

ठाणे-मुंबई मार्गावर कोपरी रेल्वेपुलाच्या कामामुळे नेहमीच वाहतूककोंडी होते. या पार्श्वभूमीवर या रेल्वेपुलाच्या कामाची पाहणी विचारे यांनी ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के तसेच शासकीय अधिकारी यांंच्यासमवेत बुधवारी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे :  मुंबई-अहमदाबाद पूर्व द्रुतगती राष्ट्रीय महामार्गावरील कोपरी रेल्वेपूल हा अरुंद असल्याने या ठिकाणी मुंबईकडे ये-जा करताना तसेच नाशिक-अहमदाबादला जाणाऱ्यांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर कोपरी रेल्वेपुलाच्या गर्डरचे काम तत्काळ पूर्ण करून तो फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात वाहतुकीसाठी खुला करावा, असे निर्देश खा. राजन विचारे यांनी ठाण्यातील अधिकारी यांना बुधवारी दिले.

ठाणे-मुंबई मार्गावर कोपरी रेल्वेपुलाच्या कामामुळे नेहमीच वाहतूककोंडी होते. या पार्श्वभूमीवर या रेल्वेपुलाच्या कामाची पाहणी विचारे यांनी ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के तसेच शासकीय अधिकारी यांंच्यासमवेत बुधवारी केली. यामध्ये मध्य रेल्वे विभागाचे उपमुख्य अभियंता डी. डी. लोलगे, एमएमआरडीएचे अभियंता सुर्वे, महाराष्ट्र विद्युत महामंडळाचे अधीक्षक अभियंता अरविंद बुलबुले, ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते.

फेज-१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करा२४ एप्रिल २०१८ रोजी सुरू झालेल्या कोपरी पुलाचे बांधकाम मे २०२१ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, कोरोनामुळे बंद पडलेले काम सुरू करण्यासही त्यांनी मंजुरी मिळवली होती. बुधवारी हा पाहणी दौरा झाला. त्यावेळी विचारे यांनी ६५ मीटर लांबीच्या १४ गर्डरपैकी फेज-१ च्या सात गर्डरचे काम डिसेंबरअखेरपर्यंत टाकण्याच्या सूचना रेल्वे अधिकारी यांना दिल्या.