शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कोपरी पोालिसांच्या धडक कारवाईत ४४ किलो गांजा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 22:50 IST

कोपरी भागातून सहा बॅगांमधून गांजाची तस्करी करणाऱ्या संशयितांना कोपरी पोलिसांनी हटकल्यानंतर नऊ लाख ५७ हजार २८० रुपयांचा ४४ किलो ३६४ ग्रॅम वजनाचा गांजा बुधवारी जप्त केला. पोलिसांनी या दोघांचा पाठलाग केला, मात्र अंधाराचा फायदा घेत ते तिथून पसार झाले.

ठळक मुद्दे रिक्षातून हस्तगत केला ९ लाख ७५ हजारांचा मुद्देमालआरोपींची पोलिसांच्या हातावर तुरी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कोपरी भागातून सहा बॅगांमधून गांजाची तस्करी करणाऱ्या संशयितांना कोपरी पोलिसांनी हटकल्यानंतर नऊ लाख ५७ हजार २८० रुपयांचा ४४ किलो ३६४ ग्रॅम वजनाचा गांजा बुधवारी जप्त केला. या धुमश्चक्रीत अंधाराचा फायदा घेऊन या दोघांनी मात्र पोलिसांच्या हातावर तुरी देऊन तिथून पलायन केले. या दोघांचाही शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.कोपरीतील शास्त्रीनगर टीएमटी बस थांब्यासमोरील सार्वजनिक रस्त्यावर ३ मार्च २०२१ रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास सहा बॅगा दोघेजण संशयास्पदरित्या घेऊन जात असल्याचे गस्तीवरील पोलीस उपनिरीक्षक प्रमोद साळवी तसेच पोलीस व्हॅनचे चालक शेडगे आणि अंमलदार लोंढे यांना आढळले. हे दोघेही एका रिक्षामध्ये या बॅगा ठेवण्याच्या तयारीत होते. त्याच वेळी साळवी यांच्या पथकाने त्यांना हटकले. या बॅगांमध्ये तांदूळ आणि कपडे असल्याची बतावणी त्यांनी केली. याची पडताळणी करण्यासाठी साळवी यांच्या पथकाने त्यांना बॅगा उघडण्यास सांगितले. त्याचवेळी या दोघांनी तिथून पळ काढला. पोलिसांनी या दोघांचा पाठलाग केला, मात्र अंधाराचा फायदा घेत ते तिथून पसार झाले. या बॅगांपैकी एका बॅगेत दोन किलो ७४ हजार ४८० रुपयांचा १३ किलो ७२४ ग्रॅम वजनाचा गांजा मिळाला. तर दुसºया बॅगेत आठ किलो ६०८ ग्रॅम इतका गांजा चार गठठयांमध्ये मिळाला. अन्य एका बॅगेतून एक लाख ७० हजार १२० रुपयांचा गांजा मिळाला. अशा सहा बॅगांमधून नऊ लाख ५७ हजार २८० रुपयांचा ४४ किलो ३६४ ग्रॅम वजनाचा गांजा पोलिसांनी जप्त केला.या प्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध एनडीपीएस अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक ममता डिसुझा यांनी दिली. पसार झालेल्या दोन्ही आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी