शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

कोपर उड्डाणपूल आजपासून होणार बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2019 00:54 IST

कोपर उड्डाणपूल कमकुवत झाल्याने तो रविवारी सायंकाळपासून वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी दिली.

डोंबिवली : पूर्व-पश्चिमेला जोडणारा कोपर उड्डाणपूल कमकुवत झाल्याने तो रविवारी सायंकाळपासून वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी दिली. त्यामुळे शहरातील सर्व वाहतूक अरुंद असलेल्या ठाकुर्ली पुलावरूनच वळवण्यात येणार आहे. दरम्यान, कोपरपूल डागडुजीसाठी किती काळ बंद राहील, याबाबत मात्र नेमकी माहिती महापालिका, रेल्वे प्रशासन देऊ शकलेले नाही. पुलाची डागडुजी करावी की, तो पाडून नवीन बांधावा, हे देखील आताच सांगता येणार नसल्याने किमान वर्षभर डोंबिवलीकरांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागणार आहे.कोपरपुलावरून वाहतूक बंद करावी, असे पत्र केडीएमसी आयुक्त गोविंद बोडके यांनी शुक्रवारी काळे यांना दिले होते. त्यानुसार, त्यांनी हा निर्णय घेतला आहे.पूल बंद झाल्यानंतर महापालिकेने नेमलेल्या रॅनकॉन कन्सल्टंटकडून पुलाची पाहणी करण्यात येणार आहे. जमिनीच्या चाचणीचे काम शनिवारपासून सुरू झाले आहे. मात्र, रेल्वेची वाहतूक दिवसा दोन तास बंद असेल, तरच पुलाच्या खालच्या भागातील स्लॅबची क्षमता तपासणे शक्य होणार आहे, असे महापालिकेचे म्हणणे आहे. रेल्वेकडून त्यासाठी ट्रॅफिक ब्लॉक मिळणे आवश्यक आहे. पुलाची तपासणी झाल्यानंतर डागडुजीचा अहवाल मिळण्यासाठी आठवडा लागणार आहे. परंतु, रेल्वेने त्यांच्या अखत्यारित येणारे लोखंडी खांब व त्यांचे आयुष्यमान यासंदर्भात आयआयटीकडून तपासणी केली होती. मात्र, त्याचा अहवाल रेल्वेकडून मिळू शकलेला नाही. यासंदर्भात मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.