शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

कोकण पदवीधर : भाजपाला धूळ चारण्यावर सेना ठाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 05:24 IST

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मातोश्रीची पायरी चढून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी गुफ्तगू केल्यानंतरही युतीमधील तणाव कमी झाल्याचे दिसत नाही.

ठाणे : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मातोश्रीची पायरी चढून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी गुफ्तगू केल्यानंतरही युतीमधील तणाव कमी झाल्याचे दिसत नाही. कोकण पदवीधर मतदारसंघातून माघार घेण्याचा शिवसेनेचा इरादा नाही. उलटपक्षी, आम्ही जिंकण्यासाठी मैदानात उतरलो आहोत, असे शिवसेनेने स्पष्ट केले. याच न्यायाने मुंबई पदवीधर मतदारसंघात भाजपाने शिवसेनेविरोधात उमेदवारी दाखल केली आहे.भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या चर्चेचे फलित म्हणून कोकण व मुंबई पदवीधर मतदारसंघांत परस्परांविरुद्ध दिलेले उमेदवार माघार घेतील, अशी अपेक्षा होती. मात्र, अद्याप त्या दिशेने हालचालीची चिन्हे दिसत नाहीत. अर्थात, उमेदवारी अर्ज ११ जूनपर्यंत मागे घेण्याचा कालावधी बाकी आहे.कोकण पदवीधर हा मतदारसंघ वर्षानुवर्षे भाजपाच्या, तर मुंबई पदवीधर हा मतदारसंघ सेनेच्या ताब्यात होता.कोकण पदवीधर मतदारसंघात शिवसेनाविरुद्ध भाजपा सामना अटळ असून शहा-ठाकरे चर्चेनंतरही परिस्थितीत फरक पडलेला नाही, असे स्पष्ट दिसत आहे.कोकण पदवीधर मतदारसंघातील निवडणूक जिंकण्यासाठीच शिवसेनेने उमेदवार उभा केला आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही. अमित शहा हे उद्धव ठाकरे यांना भेटायला आले होते. ठाकरे त्यांना भेटायला गेले नव्हते, हे भाजपाने लक्षात घ्यावे.- नरेश म्हस्के, जिल्हाप्रमुख, शिवसेना

टॅग्स :thaneठाणे