शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
2
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
3
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
4
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा
5
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
6
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
7
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
8
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
9
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
10
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
11
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
12
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
13
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी
14
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
15
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
16
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
17
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
18
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
19
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
20
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?

सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयात ७ ऑक्टोबर रोजी कोकण विभागीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: October 1, 2022 16:04 IST

Thane News: सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयात ‘कै.ग.का.फणसे व कै.इंदिराबाई फणसे स्मृती चषक’ कोकण विभागीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा रंगणार आहे.

- प्रज्ञा म्हात्रेठाणे : सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयात ‘कै.ग.का.फणसे व कै.इंदिराबाई फणसे स्मृती चषक’ कोकण विभागीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा रंगणार आहे. ७ ऑक्टोबर रोजी ‘कै.इंदिराबाई फणसे या मथळ्यांतर्गत कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत यंदाही चुरस आहे.

तरूणांमधून देशहितास आवश्यक विचारसंपन्न वक्ते घडवावेत या उदात्त हेतूने सदर वक्तृत्व स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवली गेली, यंदाचे या स्पर्धेचे १८ वे वर्षे आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला प्रोत्साहनपर प्रमाणपत्र व पुस्तक देण्यात येणार आहे. तर, विजेत्यांना रोख रक्कम, प्रमाणपत्र व फिरता चषक असे पारितोषिकांचे स्वरूप आहे. प्रत्येक सहभागी महाविद्यालयांतील कमाल दोन विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. स्पर्धेसाठी यंदा ‘मला राजकारणात जायचंय…!’,’अमृतमहोत्सव स्वातंत्र्याचा, मागोवा देशस्थितीचा, ‘साहित्यिकांची जन्मशताब्दी म्हणजे वाचन महोत्सव’, ‘आभासी शिक्षणव्यवस्था -सकारात्मक की नकारात्मक’,’कृत्रिम जगाची वाढती मागणी : प्रगतीची खूण की धोक्याची नांदी’ अशा विविध विषयांचा समावेश आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छूक महाविद्यालयांनी https://bit.ly/3RxsS0w या लिंकवर क्लिक करून ५ ऑक्टोबरपूर्वी स्पर्धकांची नोंदणी करणे आवश्यक आहे असे आवाहन, स्पर्धा प्रमुख प्रा.मनिषा राजपूत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी प्रा.हरेश्वर भोये- ९७६७६४५७७० व प्रा.महेश कुलसंगे-९०११२७८४८८ यांच्याशी संपर्क साधावा असेही या आवाहनात म्हटले आहे.  या स्पर्धेच्या नियोजनासाठी डॉ.वंदना शिंदे, प्रा.दिलीप वसावे, प्रा.कांतीलाल चव्हाण मोलाची भूमिका निभावत आहेत. संस्थेचे सचिव कमलेश प्रधान व प्राचार्य डॉ.गणेश भगुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येत आहे.

टॅग्स :collegeमहाविद्यालयthaneठाणे